विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा पीक आराखडा तयार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 02:22 PM2019-03-08T14:22:00+5:302019-03-08T14:22:05+5:30
अकोला: विदर्भातील शेती व उद्भवणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा आराखडा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी तयार करण्यात आला.
अकोला: विदर्भातील शेती व उद्भवणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राचा आराखडा अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी तयार करण्यात आला. येणाºया खरीप हंगातील पीक परिस्थिती व लागणारे तंत्रज्ञान, यासंबंधी विषय तज्ज्ञांना तयार ठेवण्यासाठीचे नियोजन करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि संचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद- अटारी, पुणे यांच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विदर्भातील कृषी विज्ञान केंद्राची दोन दिवसीय कृती आराखडा कार्यशाळा आयोजित करण्यात आली. गुरुवारी येथे येणाºया खरीप हंगामातील पीक परिस्थिती शेतकऱ्यांना येणाºया अडचणी, जिल्हानिहाय पिके , संभाव्य किडींचा प्रादुर्भाव आदी इत्थंभूत विषयावर येथे मंथन होऊन एक आराखडा तयार करण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासह शेतकºयांना तातडीने सल्ला व तंत्रज्ञान, व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी आतापासूनच विषय तज्ज्ञांना जबाबदारी सोपविण्यात आली. ग्रामीण भागातील शेतीविषयक समस्या, उपलब्ध संसाधने आणि कृषी विद्यापीठाकडून अपेक्षित तंत्रज्ञान, शिफारशी, संधोधनविषयक बाबी संबंधित विभागाला अवगत करीत तातडीने समाधान शोधून शेतकºयांना दिलासा देणे हे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचे दायित्व असल्याने या सर्व अनुषंगाने तयारी करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रतिकृषी विद्यापीठ असून, प्रत्येक केंद्राला विषयवार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ज्यांना त्या त्या जिल्ह्यातील विभागनिहाय शेती आणि शेतकरी वर्गांची समस्या, उपलब्ध संधी, विविध शासकीय योजना, विद्यापीठाद्वारे त्या भागासाठी निर्मित तंत्रज्ञान, शिफारशी, पीक वाण आदींचा अभ्यास आहे. सदर केंद्रातील तज्ज्ञांनी शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. कार्यशाळेच उद्घाटन डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले होते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे यांनी विषय तज्ज्ञांना मार्गदर्शन केले.