विदर्भस्तरीय मूकबधिर (दिव्यांग) क्रिकेट स्पर्धा रंगणार अकोल्यात!
By रवी दामोदर | Published: February 7, 2024 04:31 PM2024-02-07T16:31:38+5:302024-02-07T16:31:51+5:30
शासकीय विश्रामगृहात दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
अकोला : दिव्यांगांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्यात मैदानी खेळांचे स्वारस्य निर्माण व्हावे, यासाठी विदर्भात प्रथमच महानगरात विदर्भस्तरीय मूकबधिर (दिव्यांग) टी- २० क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विदर्भातील मूकबधिर (दिव्यांग) १४ क्रिकेट संघ सहभागी होत असल्याची माहिती अकोला जिल्हा मुकबधिर दिव्यांग मित्र मंडळाचे मनोज महाजन यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
अकोला जिल्हा मूकबधिर ( दिव्यांग )मित्र मंडळाच्या वतीने आगामी दि. १० व ११ फेब्रुवारी रोजी कृषी विद्यापीठाच्या मैदानवर दोन दिवसीय विदर्भस्तरीय क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील अशा प्रकारचे हे पहिलेच मूकबधिर (दिव्यांगजणांचे) आयोजन असून, स्पर्धेत नागपूर शहर व ग्रामीण, अमरावती शहर व ग्रामीण, अकोला समवेत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील एकूण १४ संघ व २५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. दोन दिवशीय मुकबधिर (दिव्यांग) क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ शनिवारी होणार आहे.
पत्रकार परिषदेत अकोला जिल्हा मुकबधिर अध्यक्ष पंकज जायले, माजी नगरसेवक मंगेश काळे, आयोजन समितीचे अमोल देशमुख, गुणवंत महल्ले, अभय मुळे,मधुर खंडेलवाल, मिलिंद गोहरकर, अश्विन कट्टा, अभय आगरकर, किशोर देशमुख ,प्रणय बाबर,मिलिंद गोतरकर,जयदीप ढोले,अमय आगरकर समवेत अनेक मूकबधिर (दिव्यांग) पदाधिकारी उपस्थित होते.