विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक मराठी एकांकिका स्पर्धा १५ व १६ ऑगस्टला अकोल्यात
By Atul.jaiswal | Published: July 25, 2023 06:29 PM2023-07-25T18:29:56+5:302023-07-25T18:30:01+5:30
विदर्भातून प्रवेश अर्ज मागवून त्यातील निवडक वीस एकांकिका या स्पर्धेमध्ये सहभागी असतात.
अकोला: नवयुवक क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय संस्था संचालित सिद्धी गणेश प्रोडक्शन या नाट्य संस्थेतर्फे स्वातंत्र्य करंडक विदर्भ स्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा १५ व १६ ऑगस्ट रोजी अकोला येथील प्रमिलाताई ओक सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना एक सलाम म्हणून गत नऊ वर्षांपासून दरवर्षी ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते.
विदर्भातून प्रवेश अर्ज मागवून त्यातील निवडक वीस एकांकिका या स्पर्धेमध्ये सहभागी असतात. यामध्ये प्रथम तीन पारितोषिक आणि वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतात. या स्पर्धेत संपूर्ण विदर्भातून स्पर्धक येत असतात. यावर्षीची स्वातंत्र्य करंडक ही एकांकिका स्पर्धा ही १९ नाट्यसंघांमध्ये होणार असून १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अक्षय पिंपळकर मंदार घेवारे हे प्रयत्न करीत आहेत. रसिक प्रेक्षकांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आयोजक सचिन गिरी यांनी कळविले आहे.
नाट्य संघ आणि एकांकिका
- "लालटेन "नट श्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन
- "नमस्कारासन" किरण फाउंडेशन, अकोला
- "मॅडम" ऊर्जा फाउंडेशन अकोला
- "गेट वेल सून दामले " हिमा फाउंडेशन अकोला
- "लेखकाचा कुत्रा" जनकल्याण बहुउद्देशीय संस्था अकोला
- " शुभमंगल सावधान....." महावितरण सांस्कृतिक मंडळ
- " दे दान त सुटे गिरान पारमिता अकोला
- "कॅलिडोस्कोप" अ ब क नाट्य मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती
- "ॲक्ट" गंधर्व बहुउद्देशीय संस्था अमरावती
- "मधुमोह "अथ इति नाट्य प्रतिष्ठान अमरावती
- " नाटेवा न्नसप्र" अभिनव क्रिएटिव्ह ग्रुप बुलढाणा
- "अनपेक्षित" माणुसकी मल्टी फाउंडेशन, बुलढाणा
- "ओल्या भिंती "कलाज्ञ थीएटर वर्धा
- "सैकंड हॅन्ड" नाट्य प्रतीक थिएटर,
- "मन्वतर"निरामय क्रिएशन्स वर्धा
- "रात्र काळी" शुभारंभ थिएटर यवतमाळ
- "ऋण "आर्टिस्ट व्हाया मंच
- "अ क्वेशन "निओ कास्ट थिएटर नागपूर
- "दिव्य दान" अभूनी सेवा संस्था नागपूर