Akola: विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस १० दिवस नागपूरपर्यंतच धावणार

By Atul.jaiswal | Published: December 5, 2023 12:48 PM2023-12-05T12:48:44+5:302023-12-05T12:49:45+5:30

Akola News: नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Vidarbha, Maharashtra Express will run till Nagpur only for 10 days | Akola: विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस १० दिवस नागपूरपर्यंतच धावणार

Akola: विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस १० दिवस नागपूरपर्यंतच धावणार

- अतुल जयस्वाल 
अकोला - नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने २ ते १४ डिसेंबर या कालावधीत काही गाड्या रद्द, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. परिणामी विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेस ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूरपर्यंतच धावणार आहे.

मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ५ ते १३ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरपर्यंतच धावणार आहे. १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ६ ते १४ डिसेंबरपर्यंत गोंदिया ऐवजी नागपुरातून सुटणार आहे.११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ४ ते १२ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरपर्यंतच धावणार असून, ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ६ ते १४ डिसेंबरपर्यंत गोंदियाऐवजी नागपूरहून प्रवासाला प्रारंभ करेल.

Web Title: Vidarbha, Maharashtra Express will run till Nagpur only for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.