विदर्भात आता फलोत्पादन बीजोत्पादन!

By admin | Published: September 17, 2015 11:17 PM2015-09-17T23:17:28+5:302015-09-17T23:17:28+5:30

शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर; शेती व उद्यान विद्या प्रशिक्षण प्रकल्पास शासनाची मंजुरी.

Vidarbha now plantation seed production! | विदर्भात आता फलोत्पादन बीजोत्पादन!

विदर्भात आता फलोत्पादन बीजोत्पादन!

Next

अकोला : विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात असून, विदर्भात खरीप, रब्बीनंतर फलोत्पादन बीजोत्पादन प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यास राज्याच्या कृषी मंत्रालयाने मान्यता दिली आहे. २0१४-१५ व २0१६-१७ या दोन वर्ष हा प्रकल्प विदर्भात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या प्रशिक्षण प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे.
शेतकर्‍यांनी स्वत: उच्चप्रतीचे शुद्ध बियाणे निर्माण करण्यासाठी मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) प्रकल्पांतर्गत या कृषी विद्यापीठाला ८ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोत्पादन करण्यात सुरुवात केली आहे. आता नव्याने चालू आर्थिक व पुढच्या आर्थिक वर्षासाठी राज्यात शेती व उद्यान विद्या बीजोत्पादन निर्मितीवर भर दिला जाणार असून, त्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणूनच बीजोत्पादन कार्यक्रमाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्याच्या कृषी मंत्रालयाने या विषयावरील प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यासाठीची मान्यता दिली आहे.
या प्रकल्पांतर्गत गटशेतीद्वारे विविध शेती, उद्यान विद्या बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अगोदर आदिवासी भागातील शेतकर्‍यांना बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला आहे. विविध पिकाचे शुद्ध व उच्च दर्जाचे बियाणे निमिर्तीसाठी या प्रकल्पाला व्यापक स्वरू प देण्याचा कृषी मंत्रालयाचा प्रयत्न असून, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविणे शक्य असल्याने विदर्भातच नव्हे, तर राज्यात बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी आरकेव्हीवाय अंतर्गत अनुदान उपलब्ध करू न दिले जात आहे. विविध कंपन्यांचे बियाणे वांझ व बोगस निघत असल्याने या बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात आहे. शेतकरी गटाला यासाठी प्रोत्सहित करण्यात येत आहे. किमान गावातील शेतकर्‍यांची शुद्ध बियाण्यांची गरज भागावी, हा त्या मागील उद्देश आहे.
शेतकर्‍यांनी काढलेल्या शेतमालाचे पॅकिंग आणि प्रतवारी करता यावी व शुद्ध बीजोत्पादन करावे, यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आरकेव्हीवाय अंतर्गत यावर्षी या कार्यक्रमाला मान्यता मिळाली आहे. शेतकरी गटांना या प्रकल्पात प्राधान्य देण्यात येत असल्याचे कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी सांगीतले.

Web Title: Vidarbha now plantation seed production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.