विदर्भात खासगी कापूस खरेदीला सुरुवात!

By admin | Published: October 30, 2016 02:37 AM2016-10-30T02:37:40+5:302016-10-30T02:37:40+5:30

पहिल्याच दिवशी ४,९0१ रुपये प्रतिक्विंटल भाव ; खेडा पद्धतीनेही कापूस खरेदी

Vidarbha private buying of cotton! | विदर्भात खासगी कापूस खरेदीला सुरुवात!

विदर्भात खासगी कापूस खरेदीला सुरुवात!

Next

अकोला, दि. २९- विदर्भात खरीप हंगामातील कापूस वेचणीला सुरुवात झाली असून, दिवाळी सणाचे औचित्य साधून व्यापार्‍यांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर खासगी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ४,९0१ रुपये दर दिले. याशिवाय खेडा पद्धतीने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.
राज्यात गतवर्षी ३८ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती. यावर्षी ३८ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र केवळ १३ हजार हेक्टरने कमी झाले आहे; पण चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता कापूस तज्ज्ञ व प्रगतशील शेतकर्‍यांनी वर्तविली आहे. राज्यात मराठवाडा, खान्देश व सोलापूर जिल्हय़ांचा भाग तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्हय़ांत कापूस उत्पादन घेतले जाते. कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकर्‍यांना दिवाळीत हाती पैसा येतो. त्यामुळे शेतकरी कापूस व्रिकी करण्यासाठी खरेदी कें्रद उघडण्याच्या प्रतीक्षेत असतात.
विदर्भात अकोला जिल्हय़ात अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खासगी खरेदी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी या भागातील शेतकर्‍यांनी कापूस विक्रीला आणला आहे. यावेळी प्रथम कापूस विक्रीला आणणारे भांबेरी येथील शेतकरी सदाशिव भारसाकळे यांचा परंपरेनुसार शाल व नारळ देऊन येथे सत्कार करण्यात आला. तसेच खेडा पद्धती म्हणजे व्यापार्‍यांनी यावर्षी आतापासूनच थेट गावात जाऊन शेतकर्‍यांकडील कापूस खरेदी सुरू केली आहे. यापर्षी कापूस रेचेही कापूस खरेदीसाठी सरसावले आहेत.

अल्पभूधारक शेतकर्‍यांचा खासगी खरेदी केंद्रांकडे कल
यावर्षी कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र १५ नोव्हेंबरला सुरू होणार असल्याचे पणन महासंघाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना खासगी कापूस खरेदी केंद्राचाच सध्या पर्याय आहे. शिवाय, खासगी कापूस खरेदी केंद्रावर हमी दरापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकर्‍यांनी कापूस विक्रीला काढला आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकर्‍यांचे सध्या तरी प्रमाण अधिक आहे.

- खासगी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांना सध्या तरी ४,९00 रुपये प्रत्ििक्ंवटलपर्यंत दर दिले जात आहेत.
बसंत बाछुका,
कापूस उद्योजक, अकोला.

Web Title: Vidarbha private buying of cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.