विदर्भातील जमिनीत अन्नद्रव्य,स्फ ूरद,जस्त घटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 06:04 PM2019-03-26T18:04:00+5:302019-03-26T18:04:32+5:30
अकोला: विदर्भातील जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष काढण्यात आले.
अकोला: विदर्भातील जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष काढण्यात आले असून, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पध्दतीनुसार विविध संसाधनाचा वापर करू न जमिनीचे आरोग्य सुधारणे हाच एक उपाय आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठी मीतीचे परीक्षण करू न पिकांचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात केंद्र सरकार पुरस्कृत संशोधन प्रकल्पामध्ये भौगालिक स्थळ व माहिती प्रणाली आधारीत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करू न हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी व सहकार विभाग आणि भारतीय कृषी संशोधप परिषदेच्या भोपाळ येथील भारतीय मृद विज्ञान संस्था यांनी या प्रकल्पाला निधी उपलब्ध करू न दिला होता. या प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. या प्रकल्पातंर्गत तेव्हा ४,४६४ माती नमुन्यांच्या आधारे विदर्भातील जमिनीची सुपिकता तपासण्यात आली होती. यातंर्गत हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यांनतर पुन्हा अन्नद्रव्या विविध घटकांचे प्रमाण कमी झाले आहेत. जमिनीत वापरण्यात येणारे विविध रसायने किटक नाशके याचाही परिणाम होत आहे.
- स्फूरद,जस्त, गंधक घटले
या निष्कर्षावरू न विदर्भातील जमिनींमध्ये ९७.३६ टक्के नत्राची कमतरता आढळून आली आहे. स्फूरद ४९.४०,गंधक २०.४५ व जस्त ५०.७७ टक्के आढळून आले आहे. त्याचप्रमाणो लोह, पालाश, बोरॉन या अन्नद्रव्याचे प्रमाण घटल्याचे आढळले आहे. हे प्रमाण या आधीच्या अभ्यासातील प्रमाणापेक्षा कमी झाले आहे. ही धोक्याची घंटा आहे.
-जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी या निष्कर्षाचा आधार घेऊन तात्काळ उपाय योजना करव्या. योग्य पिके, खताचा संतुलीत वापर, समस्यायुक्त जमिनीची सुधारणा, मृद व जलसंवर्धनावर भर द्यावा लागणार आहे. विशेष:त मातीचे परीक्षण करू न व्यवस्थापन करावे लागणार आहे. यासाठीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंदेकृवि, अकोला.