विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विद्युत भवनसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:34 PM2020-02-01T18:34:09+5:302020-02-01T18:34:17+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शनिवारी महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवना समोर धरणे देण्यात आले.
अकोला : वीज बिल निम्मे करावे, तसेच कृषी पंपांचे भारनियमन बंद करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह शेतकरी व विज ग्राहकांच्या इतर मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शनिवारी महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवना समोर धरणे देण्यात आले. समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या धरणे आंदोलनात वºहाडातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी सामील झाले होते. या मध्ये सुरेश जोगळे,अशोक अमाणकर,गजानन अमदाबादकर, विलास ताथोड, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, अमृतराव देशमुख, दामोदर शर्मा, ओमप्रकाश तापडिया, मुजाहद खान, करीम भाई, मुकेश मसुरकर, गुलाबराव मसाये, मामा वानखडे, शरद सरोदे, शंकरराव कवर, प्रकाश लढ्ढा,डॉ. वि. रा. घाडगे, डॉ. विजय कुबडे, सतीश प्रेमलवार, राजेंद्र आगरकर,आशीष देशमुख, उद्धव जाधव, सतीश देशमुख,शिवदास पाटील, प्रकाश निमकडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी महावितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.विदर्भातील शेतकरी, मजूर, व्यापारी, लघु उद्योजक व ग्राहक यांचे विजेचे बिल निम्मे करण्यात यावे, कृषी पंपाचे भारनियमन कमी करण्यात यावे व औष्णिक विद्युत केंद्रा मूळे होणारे प्रदूषण मुक्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.