विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता

By admin | Published: September 17, 2015 11:14 PM2015-09-17T23:14:39+5:302015-09-17T23:14:39+5:30

१७ ते १९ सप्टेंबरपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज.

Vidarbha today's possibility of heavy rains | विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता

विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता

Next

अकोला : विदर्भात तुरळक ठिकाणी शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुढील ३६ तासांत उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या काही भागामधून परतलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाची सीमा कायम आहे. तसेच पश्‍चिम-मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून,आता दक्षिण ओडिशा व लगतच्या भागावर असल्याने पावसाचे वातावरण आहे. दरम्यान, १७ ते १९ सप्टेंबरपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १८ सप्टेंबर रोजी कोकण-गोवा, उत्तर-मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार तर दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २0 सप्टेंबर रोजी कोकण -गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे व आसपासच्या परिसरात १८ ते २0 सप्टेंबपर्यंत अधून-मधून पावसाची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई व आसपासच्या परिसरात १८ सप्टेंबर रोजी अधून मधून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Web Title: Vidarbha today's possibility of heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.