विदर्भात वनौषधी, सुगंधी वनस्पती क्षेत्र वाढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:06 PM2018-03-03T17:06:34+5:302018-03-03T17:06:34+5:30
अकोला : विदर्भात वनौषधी,सुंगधी वनस्पतीचे क्षेत्र वाढून,शेतकºयांना मुल्यवर्धीत शेती करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे.
अकोला : विदर्भात वनौषधी,सुंगधी वनस्पतीचे क्षेत्र वाढून,शेतकºयांना मुल्यवर्धीत शेती करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पाऊल उचलले असून, विद्यापीठाने पतंजली समूहासोबत चर्चा करू न काही सकारात्मक सामंजस्य करार करता येतील का याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही एम भाले यांनी वाशीम येथे बाबा रामदेव यांची भेट घेऊन या विषयावर सकारात्मक चर्चा केली आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली, राष्ट्रीय औषधी व वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांचे सह केंद्रीय औषधी व सुगंधी व वनस्पती केंद्र,लखनऊच्या सहयोगाने वनौषधी प्रजातीच्या प्रसिद्धीसाठी उपक्रम राबविण्यात येत असून ‘बायो विलेज ’संकल्पाना साकरण्यासाठी सुद्धा विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
वैदर्भीय शेती शाश्वत व शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाद्वारे विविध पयार्यांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. जिरायती शेतीला पूरक व्यवसायाची आणखी साथ मिळाल्यास. या भागातील शेतीला निश्चितच चांगले दिवस येतील.विद्यापीठाच्या विविध विभागांनी याकामी अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत उत्पादन व प्रक्रीया संदर्भात सामंजस्य करार करीत शेतीला स्थैर्य प्रदान करण्यासाठी आपली भूमिका बजावली आहे. शेतीआधारित व्यवसायांच्या या मालिकेत औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्व व मागणी लक्षात घेता विद्यापीठाने नागार्जुन वनौषधी उद्यानाची निर्मिती सन १९७६ साली केली असून अतिशय पुरातन व जवळपास ५२० चे वर औषधी प्रजाती जोपासणाºया उद्यानाची नोंद केंद्र स्थरावर सुद्धा झाली आहे. मौल्यवान औषधी व सुगंधी वनस्पतीचे संकलन व संवर्धन, ओळख, उपयोगिता व लागवड पद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी विविध प्रशिक्षणे व कार्यशाळाचे आयोजन या विभागाद्वारे करण्यात येते. भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली, राष्ट्रीय औषधी व वनस्पती मंडळ,
नवी दिल्ली यांचे सह केंद्रीय औषधी व सुगंधी व वनस्पती केंद्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून विद्यापीठाद्वारे शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती देतांना डॉ. भाले यांनी औषधी व सुगंधी वनस्पती विभागाच्या उपलब्धी बाबत रामदेव बाबांना अवगत केले व विद्यापीठाकडे उपलब्ध जमीन, साधन सामुग्री याचा उपयोग करून औषधी निर्मितीसाठी भरीव योगदान देण्याबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली. तसेच शेतकºयांचे गट तयार करून पतंजली समूहाला लागणारा कच्चा माल उत्पादित करण्याचे तंत्र व इतर सहाय करता येईल असे आश्वासीत करण्यात आले. या भेटी प्रसंगी विधान सभा सदस्य आ. राजेंद्र पाटणी, किसान सेवा समितीचे राज्य प्रमुख (पूर्व) राधेश्याम धूत यांचे सह विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या प्रमुख डॉ. वर्षा टापरे, सेवा निवृत्त माजी प्रमुख डॉ. संजय वानखडे, सहयोगी प्राध्यापक डॉ.नितीन पतके , वाशीम येथील संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विकास गौड यांची उपस्थिती होती.
वनौषधी,सुंगधी वनस्पती लागवडीसंदर्भात बाबा रामदेव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असे झाल्यास विदर्भात या मुल्यवर्धीत पिकांना शेतीला चांगले दिवस येतील.
- डॉ. व्ही.एम.भाले, कुलगुरू , डॉ. पंदेकृवि,अकोला.