विदर्भात आज वादळी वार्यासह पावसाची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 08:10 PM2017-09-14T20:10:28+5:302017-09-14T20:10:48+5:30
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, येत्या चार दिवस विदर्भात तुरळक स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, येत्या चार दिवस विदर्भात तुरळक स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आल आहे.
मागील चोवीस तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बर्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या १५ ते १८ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह राज्यात बर्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बर्याच ठिकाणी, शनिवारी कोकण- गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बर्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहु तांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण-गोवा व विदर्भात बर्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१५ सप्टेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी वादळी वार्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भात मागील चोवीस तासात गुरुवार सायंकाळी ५.३0 वाजतापर्यंत अकोला येथे 0.१ मि.मी., अमरावती १.४ मि.मी., बुलडाणा २.0 मि.मी., ब्रह्मपुरी १४.0 मि.मी., गोंदिया ४.२ मि.मी., नागपूर येथे ५.२ तर वर्धा येथे १.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे