विदर्भातील दीड लाख एकर जमीन शोधण्याचे आव्हान !

By admin | Published: September 24, 2015 11:43 PM2015-09-24T23:43:56+5:302015-09-24T23:43:56+5:30

भूदान यज्ञात देशात ४७ लाख ६३ हजार ६७२ एकर जमीन दान मिळाली होती; मात्र प्रत्यक्षात मिळालेली जमीन कुठे आहे याचा शोध घेण्याचे आव्हान.

Vidarbha's quest to find half acre land! | विदर्भातील दीड लाख एकर जमीन शोधण्याचे आव्हान !

विदर्भातील दीड लाख एकर जमीन शोधण्याचे आव्हान !

Next

किशोर खैरै / नांदुरा (जि. बुलडाणा) : स्वातंत्र्योत्तर काळातील भूदान चळवळीच्या ६५ वर्षांनंतर राज्य शासनाने भूदान यज्ञ मंडळाच्या माध्यमातून दान करण्यात आलेल्या जमिनीचा शोध सुरू केला आहे. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २0१५ मध्ये त्यानुषंगाने प्रारंभ झाला असून राज्यात दोन लाख दहा हजार एकर जमीन भूदान चळवळीअंतर्गत त्यावेळी दान दिल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भात एक लाख ६0 हजार एकर शेतजमीन शोधण्याचे काम आता या भूदान यज्ञ मंडळ समितीस करावे लागणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरुंनी आचार्य विनोबा भावेंना संपूर्ण देशात भूदान यज्ञ चळवळ राबविण्याचे सांगितले होते. त्यानुसार विनाबाजींनी भारत भ्रमण करून ४७ लाख ६३ हजार एकर जमीन भुदान यज्ञात मिळविली होती. ज्या गावची जमीन त्याच गावच्या इसमास दान देण्याचा नियम होता. ह्यभूदान जमीन गावाची, राखन करा तिचीह्ण असा संदेश देत त्या काळी गरीबांना या जमीनीचे पट्टे वाटप करण्यात आले होते. भूदान जमीनीचे पट्टे गावालगत असल्याने व वाढत्या नागरिकीकरणामुळे त्यांच्या किंमती गगणाला भिडल्या. परिणामी काही ठिकाणी या जमीनवर थेट प्लॉटीग करण्यात आले. याकडे शासनाचेही दुर्लक्ष झाले. १९९२ ते ९६ पर्यंत भूदान यज्ञ मंडळ शासनाने गठीतच केले नव्हते. या काळात अनेक पट्टेधारकांनी कथित स्तरावर अधिकार्‍यांना हाताशी धरून भूदान ऐवजी भूस्वामी वर्ग एक असा बदल करीत या पट्टय़ांची सर्रास विक्री केली. अनेक ठिकाणी भूदान कायद्याविरुद्ध अवैध हस्तांतरण, व्यवहार आणि शासनाच्या रेकॉर्डवर चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. भूदानच्या या जमीनीचा लेखाजोखा मिळावा, त्याचा व्यवहार सुरळीत व्हावा म्हणून गुरुदेव सेवाश्रमाचे आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी २0१५ ला भूदान यज्ञ मंडळ समितीचे गठण करण्यात येऊन सचिवपदी यवतमाळ येथील एकनाथ डगवा, सदस्य म्हणून अँड. माधवराव गडकरी (नागपूर), माजी खासदार विलास मुत्तेमवार (नागपूर), अविनाश काकडे (वर्धा), प्रा. हरिभाऊ क्षीरसागर (वाशिम), वसंत केदार (अकोला), माणिकराव दुधलकर (बल्लारशा), मुकूंद म्हस्के (सालोड हिरापूर) राजेंद्र लोंदासे (तिरोडा, गोंदिया), प्रज्ञा चौधरी (यवतमाळ) यांचा समावेश करण्यात आला होता. यासंदर्भात भुदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही संपूर्ण राज्यातील भूदानाची जमीन हुडकून त्याचे वाटप योग्य लाभार्थ्यांना करू. त्याकरीता बराच वेळ लागणार आहे. परंतू सर्व कामे प्रांजळ र्‍हदयाने केले जातील, असे सांगीतले.

मेळाव्यामुळे गैरप्रकार समोर

 जिल्हास्तरावर भूदान यज्ञ मंडळाने मेळावे सुरू केल्याने आता अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील साडेचार हजार एकर पैकी निम्म्या जमीनीचा शोध अद्याप लागला नाही. काही वहीवाटदरांनी वर्ग दोनची ही जमीन वर्ग एक करून विकून टाकल्याचे सर्वेक्षणादरम्यान समोर आले. त्यामुळे विक्री करणार्‍या व त्यांना सहकार्य करणार्‍यांवर कार्यवाही करण्याची गरज आहे. कारण चळवळीदरम्यान जमीनी दान देणार्‍यांपैकी काहींचे वंशज आज भूमिहीन झाले आहेत.

तुकडोजी महाराजांचे सहकार्य

आचार्य विनोबा भावे यांनी विदर्भापासून या भूदान यज्ञाला सुरूवात केली होती. सुरूवातीला भूदान यज्ञाची कल्पना कुणाला पटली नव्हती. कोणी शेती दान देईल का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. परंतू त्यावेळी विनोबाजींना सर्मथ साथ मिळाली ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची !

विदर्भातील भूदानाची जमीन

जिल्हा             जमीन (एकर )

यवतमाळ         १0,४५0

वर्धा                 १९,६५५

नागपूर              ८,८२५

अमरावती          ६,२00

अकोला             ५,000

भंडारा               ६,५00

बुलडाणा            ४,५00

चंद्रपूर               ४,0५0

गडचिरोली         १,४५0

एकूण               १,६0,000

Web Title: Vidarbha's quest to find half acre land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.