VIDEO : अकोल्याच्या बाजारात बुुलडाण्यांचा झेंडू !

By Admin | Published: October 11, 2016 11:41 AM2016-10-11T11:41:49+5:302016-10-11T12:13:01+5:30

सणांच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे महत्व अधिक असते, पण यंदा ऐन हंगामाच्या तोंडवार पावसाने सारखी सरबत्ती केल्याने फुलांचे नुकसान झाले

VIDEO: A bollywood marble in Akoli market! | VIDEO : अकोल्याच्या बाजारात बुुलडाण्यांचा झेंडू !

VIDEO : अकोल्याच्या बाजारात बुुलडाण्यांचा झेंडू !

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ११ -  दसरा , दिवाळी.. सण म्हटला की फुलं आवर्जून आलीचं, त्यातही झेंडूच्या फुलांचे महत्व अधिक पण यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडवार पावसाने सारखी सरबत्ती केल्याने फुलांचे नुकसान झाले आहे. परिणामी २५ ते ३० रू पये पाव या दराने विकला जाणार झेंडू यावर्षी मात्र याच दरात किलोने विकला जात आहे. अकोला जिल्हयात फुलांचे नुकसान झाल्याने येथील बाजारपेठेत बुलडाणा जिल्हयातील फुलांची आवक वाढली आहे. 
दसरा सणाच्या पाश्वभूमीवर बाजारात झेंडू फुलांची खरेदी वाढली आहे. शहरातील प्रत्येक मार्गावर पाल टाकून, रस्त्यांच्याकडेला फुलांची दुकाने विक्रेत्यांनी थाटली आहेत. शेतकºयांनीही फुले विक्रीस आणली आहेत. पण यावर्षी लाल झेंडूच्या फुलांना ३० ते ३५ तर पिवळ्या फुलांना २५ ते ३० रूपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतक-यांचे नुकसान होत असल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी, फुल विक्रेत्यांमध्ये आहेत.
 
 

Web Title: VIDEO: A bollywood marble in Akoli market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.