VIDEO : पोलिसांनी केलेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ बोरगावमंजू बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2016 01:12 PM2016-10-13T13:12:20+5:302016-10-13T13:12:39+5:30
बोरगाव मंजु येथे पालिसांनी नवदुर्गा विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्त्यांवर केलेल्या अमानुष लाठीहल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १३ - बोरगाव मंजु येथे पालिसांनी नवदुर्गा विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्त्यांवर केलेल्या अमानुष लाठीहल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला.
गुरूवारी रात्री येथे सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून तणाव निर्माण झाला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान पालिसांनी अकोला येथुन रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण केले. त्यांनी मिरवणुकीच्या स्थळी येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला यामध्ये बालु ढवळे, मयुर जयस्वाल, आयुष जयस्वाल हे तिन युवक जखमी झाले. पोलिसांनी कुठलाही विचार न करता बळाचा वापर केला. मिरवणूकीदरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. सर्व समाजातील नागरीक उत्साहाने सहभागी होते मात्र पोलिसांनी एका कार्यकर्त्याला नाहक मारहाण केल्याचे पडसाद मिरवणुकीत उमटल्याने रात्री १२ :३० पर्यंत मिरवणुक बंद होती. रात्री उशीरा पर्यंत तणाव निवळण्यात यश आले व मिरवुणक पार पडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांंच्या दडपशाहीचा निषेध करीत पोलिसांवर कारवाईची मागणी केली. या सर्व प्रकारात रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी बोरगाव मंजूमध्ये दाखल होताच सुरू केलेल्या मारहाणीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी संपूर्ण गावातील दुकाने बंद ठेवली, सकाळी दहा वाजता मुक मोर्चा काढला. हा मोर्चा सोपिनाथ महाराजांच्या मंदिरावर गेल्यावर तिथे सभेत रुपांतर होऊन सर्वांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करीत दोषींवर कारवाईची मागणी केली. रात्री उशीरापर्यंत आमदार रणधीर सावरकर बोरगावमंजूमध्ये ठाण मांडून होते त्यामुळे गावातील तणाव निवळण्यास मदत झाली.