video - सप्तसुरांसह तेजोमय प्रकाशात उजळली दिवाळी पहाट !

By admin | Published: October 29, 2016 03:45 PM2016-10-29T15:45:09+5:302016-10-29T15:45:09+5:30

शेकडो हातांनी उजळलेल्या दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाच्या सोबतीला आसमंत भारून टाकणारे सप्त सुर अशा रम्य वातावरणात अकोलेकरांची दिवाळी पहाट उजळली

Video - Dazzling dawn in bright light with saptasura! | video - सप्तसुरांसह तेजोमय प्रकाशात उजळली दिवाळी पहाट !

video - सप्तसुरांसह तेजोमय प्रकाशात उजळली दिवाळी पहाट !

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
अकोला, दि. २९ -  हवी हवीशी गुलाबी थंडी, शेकडो हातांनी उजळलेल्या दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाच्या सोबतीला आसमंत भारून टाकणारे सप्त सुर अशा रम्य वातावरणात अकोलेकरांची दिवाळी पहाट उजळली. लोकमतच्या वतिने आयोजीत केलेल्या ह्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाने नेहरू पार्कचा परिसर शनिवारी पहाटे पाच वाजेपासुन भारावून गेला होता. 
 लोकमतच्या वाचकांसह, सखी मंच, बाल विकास मंच व युवा नेक्स्टच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला सकाळपासुनच हजेरी लावली. नेहरू पार्कचा परिसर, प्रवेशाचा मार्गावरील शेकडो पणत्या उपस्थितांनी प्रज्वलीत करून ह्यदिपावलीह्ण साकारली. यानंतर जय गुरू स्टार ग्रुपच्या वतिने सप्तसुरांची बरसात करण्यात आली. 
गणेशवंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमात एकाहूनएक सरस अशी भक्ती-भाव गितांची मेजवानी रसीकांना मिळाली.  सुंदर ते ध्यान उभे विटवरी अशा अवीट गोडीच्या भक्ती गितांसोबतच गुणगान किजिऐ राम का अशा हिंदी गितांनीही वातावरण भारावून टाकले. मनमंदिर तजाने या गितांने स्वरांची ही मैफल एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवली या वातारणातच ही ह्यगुलाबी हवा वेड लावी जिवाह्ण या गिताने सारा परिसरच  भारला गेल्याचे चित्र होते.  साधना शेटये यांनी काढलेल्या रांगोळीने सर्व परिसर नटला होता. 
अवयवदानाची तेजामये जागृती !
अवयव दान ही काळाची गरज असून या संदर्भात प्रख्यात चित्रकार प्रा.जितेंद्र डहाके यांनी डोनेट ऑर्गन ही कलाकृती रांगोळीच्या पृष्ठभूमीवर शेकडो दिव्यांनी उजळून गेली. 
देशभरातील दगडांमधून साकारले भारत माता समता शिल्प
अकोला येथील साहेबराव पाटील यांनी देशातील प्रत्येक राज्यात फिरून तेथील दगड गोळा केले आहेत. या दगडांमधूनच भारत माता समता शिल्प तयार करण्यात आले असून दिवाळी पहाटच्या निमित्ताने या शिल्पाचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

Web Title: Video - Dazzling dawn in bright light with saptasura!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.