VIDEO : बुलडाण्यात ८ महिन्यांपासून दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद
By admin | Published: October 19, 2016 04:20 PM2016-10-19T16:20:01+5:302016-10-19T16:20:01+5:30
बुलडाणा येथील शिवारात तळ ठोकून बसलेल्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश मिळाले.
Next
ऑनलाइन लोकमत
नांदुरा, (बुलडाणा), दि. १९ - शिवारात तळ ठोकून बसलेल्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात बुधवारी यश आले असून स्थानिक शेतकºयांच्या मदतीने वन विभागाने सापळा लावून बिबट्याला पकडल्यामुळे वडीसह परिसरात नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला.
राष्ट्रीय महामार्गावरील वडी शिवारात जिगांव उपसा सिंचन योजनेची पाईप फॅक्टरी असून या परिसरात गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बिबट्याचे वास्तव्य होते. कित्येकदा अनेकांना या बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण होते. वन विभाग ब-याच दिवसांपासून बिबट्याच्या मागावर होता. दरम्यान पाईपाच्यामध्ये एक पिंजरा ठेवण्यात आला होता. सदर पिंज-यात दोन भाग असून एका भागात बिबट्याला सावज म्हणून बकरी ठेवण्यात आली होती तर दुसºया बाजूचे गेट बिबट्याला प्रवेशाकरिता मोकळे ठेवण्यात आले होते. बकरीच्या आवाजामुळे बिबट्या पिंजºयात शिरताच गेट बंद झाल्याने बिबट्या अडकला. सकाळी ६ वाजेच्या दरम्यान शेतकरी अरुण करुटले व वनरक्षक एच.एच. पठाण यांना बिबट्या पिंजºयात अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आर.एफ.ओ. रवींद्र कोंडावार यांना फोन भ्रमणध्वनीवरुन माहिती दिल्यानंतर कोंडावार घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर त्यांनी बिबट्याचे मेडिकल करण्यासाठी डॉक्टर बोलावले. चाचणीत बिबट्याचे फीटनेस योग्य असल्यामुळे त्याला वाहनातून अभयारण्यात सोडण्याकरिता वन विभागाच्या कर्मचाºयांनी नेले. सहाय्यक वनसंरक्षक खामगाव पायघन, डीएफओ बी.टी. भगत हे सुध्दा वडी येथे हजर झाले होते.
शेतक-यांनी घेतला पुढाकार
गेल्या आठ महिन्यांपासून सदर बिबट्याने परिसरात उच्छाद मांडला होता. अनेक शेतकºयांच्या बकºयांवर हल्ला करून बिबट्याने ठार केल्याने नुकसान झाले होते. तर बिबट्याच्या भितीने शेतात मजूर येत नव्हते. त्यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शेतकºयांनी बिबट्यावर पाळत ठेवली होती. शेतकºयांच्या पुढाकारानेच वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्या पकडल्या गेल्याने शेतकºयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.