VIDEO : शेतक-याने स्वखर्चाने बांधले दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे
By Admin | Published: November 8, 2016 01:10 PM2016-11-08T13:10:58+5:302016-11-08T13:10:58+5:30
ऑनलाइन लोकमत शिर्ला, (अकोला), दि. 8 - राष्ट्रीय फलोत्पादन विभागाच्या योजनेद्वारे आणि स्वखर्चातून बांधलेल्या शेततळ्याच्या माध्यमातून सुधीर टेके या ...
ऑनलाइन लोकमत
शिर्ला, (अकोला), दि. 8 - राष्ट्रीय फलोत्पादन विभागाच्या योजनेद्वारे आणि स्वखर्चातून बांधलेल्या शेततळ्याच्या माध्यमातून सुधीर टेके या शेतक-याने 32 एकर जमिनीवर यशस्वी शेती केली आहे. टेके हे पातूर-बाळापूर तालुक्याच्या सीमेवरील बेलुरा बु.येथील रहिवासी आहेत.
गेल्यावर्षी पाण्याचा अभाव असल्याने त्यांनी शेतीसाठी टँकरद्वारे पाणी घेण्याचे ठरवले. मात्र 32 एकरवरील लागवड केलेले लिंबू आणि संत्र्याची बाग त्यांना वाचवता आली नाही. पाण्याअभावी बागा सुकल्या, आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले.
यामुळे शाश्वत सिंचनाची गरज असल्याचे टेकेंच्या लक्षात आले. यानंतर टेके यांनी 'मागेल त्याला शेततळे' या योजनेद्वारे राष्ट्रीय फलोत्पादन विभागातून 5 लाख 14 हजार रुपये आणि स्वतःचे 2 लाख 60 हजार रुपये खर्च करुन, 45 बाय 64 असे 2200 स्क्वेअर मीटरचे सुमारे 45 गुंठे जमिनीवर जिल्ह्यातील एकमेव शेततळे बांधले.
सुमारे दीड कोटी लिटर क्षमतेचे हे शेततळे आहे. या शेततळ्यातील पाण्यावर टेकेंनी 32 एकर जमिनीवर लिंबू, हरभरा, संत्रे, हळद पिकांचे उत्पादन घेतले आहे. तसेच मत्स्य पालनातूनदेखील त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.
https://www.dailymotion.com/video/x844h6z