VIDEO : पहिली ग पुजा बाई..देवा देवा साथ दे ! घराघरात रंगली भुलाईची गाणी
By Admin | Published: October 14, 2016 02:55 PM2016-10-14T14:55:32+5:302016-10-14T14:55:32+5:30
भुलाई, भुलाबाई म्हणून ओळखला जाणार सण भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झाला असून त्याची सांगता आश्विनी (कोजागरी) पौर्णिमेला होणार आहे.
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १४ - भुलाई, भुलाबाई म्हणून ओळखला जाणार सण भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झाला असून त्याची सांगता आश्विनी (कोजागरी) पौर्णिमेला होणार आहे. भुलाईच्या मुर्तीची प्रतिष्ठापना घरघरात झाली असून आजुबाजुच्या सगळ्या मुलीं रोज संध्याकाळी न चुकता फेर घेऊन गाणी म्हणत असल्याने रोजची संध्याकाळ ही भुलाईच्या गाण्यांनी रंगत आहे.
पहिली ग पुजा बाई..देवा देवा साथ दे ! या गाण्याने सुरू झालेला हा गाण्याचा खेळ , ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा, असे म्हणत अनेक गाणांमधून उलगड जातो. एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू असे म्हणत म्हणत पाच लिंबांपर्यंत हा खेळ उत्तरोत्तर अनेक गाण्यांनी रंगत जातो. प्रत्येक गाण्यामध्ये स्त्रीयांचे भावविश्व रेखाटले आहे.