VIDEO : तांडा चालला
By Admin | Published: November 3, 2016 03:11 PM2016-11-03T15:11:47+5:302016-11-03T15:17:12+5:30
खरीप हंगाम संपल्यानंतर भटक्या जमातींचे रोजगारासाठी भटकणे सुरु होते. हिवाळा सुरु झाला, की भटक्या जमातीचे तांडे एका गावावरून दुस-या गावात स्थलांतर करतात.
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ३ - खरीप हंगाम संपल्यानंतर भटक्या जमातींचे रोजगारासाठी भटकणे सुरु होते. हिवाळा सुरु झाला, की भटक्या जमातीचे तांडे एका गावावरून दुस-या गावात स्थलांतर करतात. या भटक्या जमातींपैकी एक असलेल्या लोहारकाम करणा-यांचा तांडा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मुक्कामास जातो तेव्हा त्यांची शिस्तबद्धता पाहण्यासारखी असते.
सध्या हिवाळा सुरु झाला असून, अकोला जिल्ह्यात लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातून भटक्यांचे तांडे दाखल झाले आहेत. रोजगाराच्या शोधात हे तांडे एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी जातात. लोहारकाम करणे तसेच मिळेल ते काम करून या भटक्या जमाती आपली गुजराण करतात. पैसा कमावण्याचे काम काम मुख्यत्वे पुरुष करत असले, तरी घर-संसार चालविण्याची जबाबदारी महिलांची असते. बैलगाड्यांवर बि-हाड थाटून या महिला तांड्याच्या पुढे चालतात. संग्रामपूर तालुक्यातील भटक्यांचा तांडा अकोला जिल्ह्यात दाखल झाला आहे. एका गावात आठ ते दहा दिवस राहुन हा तांडा दुस-या गावाकडे कूच करतो.