VIDEO - पोलीस बंदोबस्तात समृद्धी महामार्गाचे झाले सीमांकन!
By Admin | Published: February 27, 2017 05:17 PM2017-02-27T17:17:01+5:302017-02-27T17:17:01+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 27 - जिल्ह्यातील ५२ गावांना छेदून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सध्या जोरासोरात ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 27 - जिल्ह्यातील ५२ गावांना छेदून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सध्या जोरासोरात सुरू आहे. या महामार्गाला सुरूवातीपासूनच विरोध करणा-या वनोजा (ता. मंगरूळपीर) या गावात सोमवारी चोख पोलीस बंदोबस्तात सीमांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
वनोजा शिवारात ३४ आणि भुरपूर शिवारात २४ हेक्टर क्षेत्राचे सीमांकन करण्यात आले. याप्रसंगी दोन्हीही गावांमधील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र, ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या १०० पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार सुरडकर यांच्यासह समृद्धी महामार्गाचे सीमांकन करणारी चमू उपस्थित होती.
https://www.dailymotion.com/video/x844sy6