VIDEO - अंध चेतनच्या व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी प्रदेशवाऱ्या!
By admin | Published: July 5, 2016 02:42 PM2016-07-05T14:42:56+5:302016-07-05T14:42:56+5:30
व्यसनाधिन होत चाललेल्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अर्थातच व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी येथून जवळच असलेल्या ९ वर्षिय अंध चेतनच्या प्रदेशवाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम : व्यसनाधिन होत चाललेल्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अर्थातच व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी येथून जवळच असलेल्या ९ वर्षिय अंध चेतनच्या प्रदेशवाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत.
वाशिमच्या एकबुर्जी धरणाला लागूनच केकतउमरा रस्त्याच्या कडेला झाडाझुडपातील चंद्रमोळी झोपडीतील रहिवासी अंध बालक चेतन पांडुरंग उचितकर याने व्यसनाधिन झालेल्या तरुण पिढीला वाचविण्यासाठी तसेच वैफल्यग्रस्त होवून आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ध्यास घेवून गायन व व्याख्यानाच्या माध्यमातून गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी प्रदेशासह कन्याकुमारी, चेन्नई येथे जावून समाजप्रबोधन केले आहे. शेतकरी आत्महत्या, भ्रृणहत्या, हुंडाबळी, विद्यार्थी आत्महत्या, नेत्रदान प्रचार, स्वच्छता अभियान आदि विविध विषयांवर समाजप्रबोधन करुन अनेकांना व्यसनमुक्त करण्यात यश मिळविले आहे. याकामी त्याला अंध असलेले प्रविण कठाळे, कैलास पाणबुडे, तुळशीदास तिवारी, अमोल गोडघासे, मुकेश इंगळे, विकास गाडेकर यांचाही सहभाग लाभला.