VIDEO : छोट्या रामची उंच उडी
By Admin | Published: January 6, 2017 03:53 PM2017-01-06T15:53:41+5:302017-01-06T16:01:34+5:30
नीलिमा शिंगणे-जगड, ऑनलाइन लोकमत अकोला, दि. ६ - जेमतेम साडेतीन ते पावणे चार फुट उंची. ठेंगणा ठुसका. मात्र, जेंव्हा ...
नीलिमा शिंगणे-जगड, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ६ - जेमतेम साडेतीन ते पावणे चार फुट उंची. ठेंगणा ठुसका. मात्र, जेंव्हा तो मैदानात उतरतो त्यावेळी प्रेक्षकांच्या नजरा त्याच्या कड़े खिललेल्या असतात. कारण छोट्या रामची उंच उडीच त्याची ओळख बनली आहे. रामराजे राजेश देशमुख असे त्याचे नाव. लोकमत अकोला स्पोर्ट फेस्टिवललाच्या पहिल्या दिवशी राम "हीरो ऑफ़ द डे" ठरला.
उंच उडीमध्ये राम विजेता ठरला. चपळतापूर्ण खेलणारा राम इयत्ता सातवीत नोएल स्कूलमध्ये शिकतो. याआधी त्याने चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी खेळ स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले. पुण्यात झालेल्या फेडरेशन स्पर्धेत अकोला जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून दिले. उंच उडी लांबउडी, अड़थला शर्यत क्रीडा प्रकार मधेय अनेक पारितोषिक रामने मिळवली आहे. प्रशिक्षक संजय मोहोड़ यांच्या मार्गदर्शनत राम वसंत देसाई क्रीड़ांगन येथे नियमित सराव करतो.
https://www.dailymotion.com/video/x844ngf