video- ‘माणुसकीच्या भिंती’ने खुलविले वंचितांच्या चेह-यावर हास्य!
By admin | Published: October 26, 2016 12:53 PM2016-10-26T12:53:36+5:302016-10-26T12:56:46+5:30
दिवाळ सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असे म्हटले जाते. घरदार, आर्थिक परिस्थिती ब-यापैकी असलेले हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.
Next
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २६ - दिवाळ सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असे म्हटले जाते. घरदार, आर्थिक परिस्थिती ब-यापैकी असलेले हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. निराधार, गोर-गरीब, भटके जीवन जगणा-यांच्या नशिबी मात्र हा आनंद नसतो. या वंचितांना अंगभर कपडे मिळावे व त्यांची दिवाळी आनंदात जावी, या उद्देशाने ‘भारत एक कदम’ या सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या ‘माणुसकीची भिंत’या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे वंचितांच्या चेह-यावर हास्य फुलले आहे.
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारभिंतीची निवड करण्यात आली आहे. ही भिंत सुशोभित करण्यात आली असून, येथे सुस्थितीत असलेले जुने कपडे, मुलांची खेळणी, चपला, चादर, ब्लँकेट अशा विविध वस्तु आणून ठेवाव्यात, असा हा उपक्रम आहे. माणुसकीच्या भिंतीकडे शेकडो सहृदयी दानशुरांनी मदतीचे हात पुढे केले.
गुरुवारी या उपक्रमाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून दररोज शहरातील नागरिक या माणुसकीच्या भिंतीवर मोठ्या संख्येने कपडे आणून ठेवत आहेत. गोर-गरीब व निराधार लोकांसाठी हा उपक्रम आनंद देणारा ठरत आहे. दिवसभर या भिंतीवर ठेवलेले कपडे व इतर वस्तु नेण्यासाठी गर्दी होत आहे. दिवाळीपूर्वी जुनेच का होईना; परंतु अंगभर कपडे मिळाल्याचा आनंद या वंचितांच्या चेहºयावर दिसून येत आहे.