विघयो लाभार्थींची कंत्राटदारांकडून अडवणूक

By admin | Published: May 20, 2014 06:49 PM2014-05-20T18:49:01+5:302014-05-20T19:14:33+5:30

बार्शिटाकळी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेतून दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारक अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकर्‍यांच्या विहिरींवर इलेक्ट्रिक मोटारपंप व विद्युत जोडणीसाठी १०० टक्के अनुदानित योजना राबविण्यात आली होती. यामध्ये विद्युत जोडणीसाठी तालुक्यात शेतकर्‍यांची

Videoconference from contractual beneficiaries of the beneficiaries | विघयो लाभार्थींची कंत्राटदारांकडून अडवणूक

विघयो लाभार्थींची कंत्राटदारांकडून अडवणूक

Next

सायखेड: बार्शिटाकळी पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेतून दारिद्र्यरेषेखालील व अल्पभूधारक अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकर्‍यांच्या विहिरींवर इलेक्ट्रिक मोटारपंप व विद्युत जोडणीसाठी १०० टक्के अनुदानित योजना राबविण्यात आली होती. यामध्ये विद्युत जोडणीसाठी तालुक्यात शेतकर्‍यांची निवड होऊन विद्युत वितरण कंपनीने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांमार्फत ही कामे सुरू आहेत. विद्युत खांब व तारा यासह इतर जड साहित्य लाभार्थी शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरचे भाडे व विद्युत जोडणीचा मोबदला संबंधित कंत्राटदार शेतकर्‍यांकडून वसूल करीत आहेत. यामध्ये गरजू शेतकर्‍यांची आर्थिक लुबाडणूक होत असून, कंत्राटदार मनमानी रक्कम वसूल करीत आहेत. विद्युत जोडणीसाठी लागणारा निधी कृषी विभागाने विद्युत वितरण कंपनीला पुरविला असतानाही तालुक्यात विघयो लाभार्थी शेतकर्‍यांकडून अवाजवी वसुली केली जात आहे. संबंधित विभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. 

Web Title: Videoconference from contractual beneficiaries of the beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.