vidhan sabha 2019 : बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:40 PM2019-09-27T12:40:37+5:302019-09-27T12:40:42+5:30
बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.
- संतोष येलकर
अकोला : विधानसभा निवडणुकीत कोणाशीही युती-आघाडी न करता, बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासह प्रदेश पदाधिकाऱ्यांनी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी दिल्लीत भेट घेऊन निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती किंवा आघाडी न करता, राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीत बसपा स्वबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.
३ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणार!
राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत बसपाचे उमेदवार निवडणूक लढविणार असून, ३० सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर दरम्यान बसपाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मायावती येणार महाराष्ट्र दौºयावर!
विधानसभा निवडणुकीत राज्यातील बसपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती लवकरच महाराष्ट्र दौºयावर येणार आहेत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले.
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची दिल्लीत भेट घेऊन विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांनी सांगितल्यानुसार कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती-आघाडी न करता राज्यातील सर्व २८८ जागा स्वबळावर लढण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व मतदारसंघांत ३० सप्टेंबर ते ३ आॅक्टोबरपर्यंत बसपाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
-सुरेश साखरे,
प्रदेशाध्यक्ष, बहुजन समाज पार्टी.