vidhan sabha 2019 : शिवसेनेत धुसफूस; मतदारसंघासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:40 AM2019-09-25T10:40:35+5:302019-09-25T10:41:09+5:30

इच्छुकांनी पक्षाकडे केवळ बाळापूर आणि अकोट मतदारसंघासाठीच ‘फिल्डिंग’ लावल्यामुळे शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे.

vidhan sabha 2019: uneasyness in Shiv Sena for constituency | vidhan sabha 2019 : शिवसेनेत धुसफूस; मतदारसंघासाठी रस्सीखेच

vidhan sabha 2019 : शिवसेनेत धुसफूस; मतदारसंघासाठी रस्सीखेच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मागील तीन वर्षांत शिवसेनेने जिल्ह्यात मजबूत पक्ष बांधणी केली. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ही बाब ध्यानात ठेवत पक्षातील पदाधिकाऱ्यांसह काही ‘आयात’ केलेल्या इच्छुकांच्या अपेक्षांना आमदारकीचे धुमारे फुटले आहेत. मध्यंतरी शिवसेनेच्या वाटेला किमान तीन मतदारसंघ अपेक्षित असल्याचे सांगत जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांची स्वपक्षीयांनी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. आता नेमके उलटे झाले असून, अकोट मतदारसंघासाठी सुप्त इच्छा मनी बाळगून असलेल्या इच्छुकांनी पक्षाकडे केवळ बाळापूर आणि अकोट मतदारसंघासाठीच ‘फिल्डिंग’ लावल्यामुळे शिवसेनेत प्रचंड धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे.
कधीकाळी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवणाºया शिवसेनेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उपरती लागली. तोपर्यंत शिवसेनेचा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक पद्धतीने आंदोलने करून प्रशासकीय यंत्रणेला निर्णय बदलण्यास भाग पाडणाºया शिवसेनेचा दरारा २०१० नंतर इतिहासजमा झाला. साहजिकच त्याचा फायदा समविचारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने उचलला. पक्षाची झालेली पिछेहाट लक्षात येईपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. यादरम्यान, एकमेकांची जिरवणाºया नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनाही उपरती झाली असली तरी तोपर्यंत बराच उशीर झाला होता. सप्टेंबर २०१६ पासून सेनेच्या नव्या बांधणीच्या व नव्या दमाच्या कार्यकारिणीमुळे गलितगात्र झालेल्या पक्षाला बळ मिळाले. जिल्हा कार्यकारिणीने गावागावांमध्ये शाखा निर्माण करून जि.प. सर्कल प्रमुख, पं.स. सर्कल प्रमुख, बुथ प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. त्याचे सकारात्मक परिणाम समोर येताच पक्षात एकमेकांची जिरवाजिरव करणारे सक्रिय झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातून केवळ एकच मतदार संघ शिवसेनेच्या वाटेला येणार, याची कुजबुज सुरू होताच पक्षांतर्गत विरोधकांनी पक्षातील इतर इच्छुकांना आमदारकीचे स्वप्नरंजन दाखवले.


बैठकीत तीन मतदारसंघांची मागणी
सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या बैठकीत सेना पदाधिकाºयांनी अकोला पूर्व किंवा अकोला पश्चिम यापैकी एक तसेच ग्रामीण भागातील अकोट व बाळापूर मतदारसंघाची मागणी रेटून धरली होती. बैठकीची सूत्रे हलविणाºया पदाधिकाºयांमध्येच आता मतदारसंघाच्या मुद्यावरून अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचे बोलल्या जात आहे. मागील तीन दिवसांपासून इच्छुकांनी मुंबईत ठाण मांडले असून, पक्ष काय निर्णय घेतो, यावरून अनेक जण तणावात असल्याची माहिती आहे.


अकोटसाठी उमेदवारच नसल्याचे रंगवले चित्र!
अकोला पूर्व (पूर्वाश्रमीचा बोरगाव मंजू) आणि अकोट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद होती. या भागातील जनतेने शिवसेनेच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. मागील काही वर्षात अकोट मतदारसंघात सेनेकडे सक्षम दावेदारच नसल्याचे चित्र काही इच्छुकांनी पक्षाकडे रंगविले. मुंबईत पाचही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असता अकोट मतदारसंघासाठी अनेक दिग्गज इच्छुक असल्याचे समोर आले. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याची शिवसैनिकांची मागणी आहे.

Web Title: vidhan sabha 2019: uneasyness in Shiv Sena for constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.