मधुमेहावर विदर्भातील तज्ज्ञाचे परदेशात संशोधन !
By admin | Published: July 24, 2015 12:58 AM2015-07-24T00:58:54+5:302015-07-24T00:58:54+5:30
हर्षल देशमुख यांना इंग्लडच्या संस्थेद्वारे तीन कोटीचे अनुदान.
राजरत्न सिरसाट/अकोला : मधुमेह (डायबिटीस).. नावात गोडवा असला तरी, या आजाराने दरवर्षी लाखो जणांचे मृत्यू होत आहेत. विदर्भातील वाशिम जिल्हय़ातील डॉ. हर्षल अरुण देशमुख (रोहणेकर) या तरुण डॉ क्टरने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक ठरणार्या गुणसुत्र प्रणालीवर संशोधन हाती घेतले आहे. या संशोधनासाठी इंग्लंड येथील राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेने त्यांना तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. येणारी सहा वर्षे ते यावर संशोधन करणार आहेत. मधुमेह हा आजार इतर देशांच्या तुलनेत भारतात झपाट्याने वाढला आहे. मधुमेह वाढीचा हा वेग कायम राहिल्यास २0३0 पर्यंत हा भारतात या आजाराचे ३६६ दशलक्ष रूग्ण राहतील. भारतातच नव्हे, तर आशिया खंडात मधुमेहाची त्सुनामीच आली आहे. डॉ. देशमुख यांनी या आजारावर अत्यंत मुलगामी संशोधन सुरू केले असून, या आजाराला प्रतिसाद देणार्या नवीन गुणसुत्र प्रणालीवर संशोधन त्यांनी हाती घेतले आहे. मधुमेहाच्या अनेक रुग्णांना इन्सुलीन, मेटफॉर्मिन दिले जाते; पण या औषधांचा परिणाम होत नसल्यास सल्फर युरियासारखे प्रयोग केले जात आहेत; पण या औषधाचाही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गुणसुत्र प्रणालीवर संशोधन हाती घेतले आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या ओघात पाश्चात्त्य खाद्याने भारतात प्रवेश केला आहे; पण वर्षानुवर्षे प्रोटीन, काबरेहायड्रेडची सवय असलेल्या भारतीयांच्या डीएनएला या पाश्चात्त्य खाद्याची सवय नसल्याने या आजारात भर पडत आहे. या आजारामुळे डोळे, किडनीवर परिणाम होतो. हा आजार नेमक ा कोणत्या अंतस्त्रावी ग्रंथीतील हारमोन्सचा अभावामुळे होतो, यावरही ते संशोधन करीत आहे. या संशोधनासाठी त्यांना तीन कोटी मिळाले असून, इंग्लंडमधील (युके) युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल अंतर्गत जेम्स कुक युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये ते संशोधन करणार आहेत. यासंदर्भात डॉ हर्षल देशमुख यांनी मधुमेहावर नेमके संशोधन करण्यासाठी युकेच्या राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेचे तीन कोटी रूपये अनुदान मिळाले असल्याचे सांगीतले.