Vijay hazare trophy : विदर्भ क्रिकेट संघात अकोल्याच्या चार खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 06:06 PM2021-02-14T18:06:59+5:302021-02-14T18:07:04+5:30
Vijay Hajare अकोला क्रिकेट क्लबचे दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे व मोहित राउत या चार खेळाडूंची निवड झाली आहे.
अकोला: २० फेब्रुवारीपासून विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला सुरूवात होत असून, स्पर्धेकरीता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. विदर्भ किक्रेट संघात अकोला क्रिकेट क्लबचे दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे व मोहित राउत या चार खेळाडूंची निवड झाली आहे. चौघांनीही नुकतीच झालेल्या सय्यद मुश्तक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे.
दर्शन नळकांडे हा मध्यम गती गोलंदाज व आक्रमक फलंदाजी करणार असून, त्याने यापूर्वी १९ वर्षाखालील भारतीय संघाचे इंग्लंड येथे प्रतिनिधित्व, रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो किंग्स एलेवन पंजाब संघाकडून आयपीएल स्पर्धेचे प्रतिनिधित्व करीत आहे. तसेच अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून, त्यानेही १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आदित्य ठाकरे हा मध्यमगती गोलंदाज असून, त्याने सुद्धा यापूर्वी १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मोहित राऊत हा डावखुरा फिरकी गोलंदाजी तसेच शैलीदार फलंदाज असा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. यापूर्वी मोहितने २३ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व व अमरावती विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
विदर्भ संघ हा एलिट ग्रुप ‘बी’ मध्ये असून, त्याचा सामना ग्रुप मधील तामिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश आणि आंद्र प्रदेश या संघासोबत होईल.