विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : अकोला संघाचा सहा गडी राखून विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:07 AM2019-02-09T11:07:54+5:302019-02-09T11:08:00+5:30

अकोला: विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील दहावा सामना वर्धा व अकोला जिल्हा संघात शुक्रवारी खेळविण्यात आला. यामध्ये अकोला संघाने सहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

Vijay Telang Smriti Inter-district Cricket Tournament: Akola won by six wickets | विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : अकोला संघाचा सहा गडी राखून विजय

विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : अकोला संघाचा सहा गडी राखून विजय

googlenewsNext

अकोला: विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील दहावा सामना वर्धा व अकोला जिल्हा संघात शुक्रवारी खेळविण्यात आला. यामध्ये अकोला संघाने सहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
वर्धा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी वेदांत बाहे आणि अक्षय रामटेके यांनी भोपळाही फोडला नाही. झटपट तंबूत परतल्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या कपिल खांदाते याने सुंदर खेळप्रदर्शन करीत ४६ धावा उभारल्या. त्याला साथ देणाºया अमृत यादव १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या नितेश चव्हाण याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करीत अर्धशतक ठोकले. नितेशने नाबाद ५७ धावा काढल्या. पवन चांभारे याने १३, हर्षल पेठे याने १२ आणि पवित्र ढोले याने ५ धावा काढल्या. करण सुकळकर, ऋषी सापकाळ, राज चौहान शून्यावर बाद झाले. अकोला संघाकडून अक्षय शर्मा याने १० षटकात ४४ धावा देत ५ गडी बाद केले. समीर डोईफोडे याने ४ बाद केले. समीर शेख याला १ गडी बाद करता आला.
प्रत्युत्तरात अकोला संघाने ३८ षटकात ५ बाद १७० धावा काढून सामन्यावर विजय मिळविला. सलामीला उतरलेल्या आर्यन मेश्रामने दमदार सुरुवात करीत ४७ धावा काढल्या. कृष्णा टापरे ९ धावेवर बाद झाला. वेदांत मुळे याने उत्तम खेळ करू न नाबाद ६६ धावा काढून सामना अकोल्याकडे झुकविला. साकेत दुतोंडे याने ३३ धावांचे योगदान दिले. अक्षय राऊत नाबाद ३ धावा केल्या. मयूर बढेला भोपळा फोडता आला नाही. वर्धा संघाकडून करण सुकळकर याने २ गडी बाद केले. पवन चांभारे, अमृत यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

 

Web Title: Vijay Telang Smriti Inter-district Cricket Tournament: Akola won by six wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.