‘मिसाईल मॅन’ ला अकोलेकरांचा विक्रमी सलाम
By admin | Published: August 16, 2015 11:49 PM2015-08-16T23:49:31+5:302015-08-16T23:49:31+5:30
‘नॅशनल इंटिग्रिटी मिशन’ने उभारले कलाम यांचे १0१ फूट उंचीचे तैलचित्र.
अकोला : 'नॅशनल इंटिग्रिटी मिशन'च्यावतीने स्वातंत्र्यदिनी अकोल्यातील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात 'मिसाईल मॅन' माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे १0१ फूट उंचीचे तैलचित्र उभारण्यात आले. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. कलामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्वराज्य भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. डॉ. कलाम यांच्या विचारांचा प्रचार व्हावा, या अनुषंगाने ३ हजार स्क्वेअर फूट माहितीपत्रावर त्यांच्याविषयी संपूर्ण महिती देण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज निर्माण करून लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणार्या 'नॅशनल इंटिग्रिटी मिशन'च्या वतीने यंदा राबविण्यात आलेल्या उपक्रमाची नोंद लिमका बुकमध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अँड. राजेश जाधव यांनी दिली.