गाव कृती आराखडा : तालुकास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:20 AM2021-07-29T04:20:20+5:302021-07-29T04:20:20+5:30

आजच्या सत्रामध्ये प्राथमिक माहिती संकलन प्रपत्र व कोबो कलेक्ट टूलचा वापर कसा करावा याविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले. आज प्रशिक्षण ...

Village Action Plan: Taluka level training started | गाव कृती आराखडा : तालुकास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात

गाव कृती आराखडा : तालुकास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात

Next

आजच्या सत्रामध्ये प्राथमिक माहिती संकलन प्रपत्र व कोबो कलेक्ट टूलचा वापर कसा करावा याविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले. आज प्रशिक्षण प्राप्त तालुक्यांचे पुन्हा ३० जुलै रोजी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे पडताळणी वजा प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.

आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये शाखा अभियंता मिलिंद जाधव शाखा अभियंता ए. व्ही. देशमुख यांच्यासह माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश डहाके, मूल्यमापन व संनियंत्रण सल्लागार राहुल गोडले, अभियांत्रिकी तज्ज्ञ सागर टाकळे, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ प्रवीण पाचपोर यांनी आभासी पद्धतीने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. २९ जुलै रोजी बार्शिटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सकाळी व अकोला तालुक्यातील कर्मचारी पदाधिकारी यांना दुपारी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रथमच होतोय कोबो कलेक्ट टूलचा वापर....

राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई आणि युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोबो कलेक्ट टूल या मुक्तस्त्रोत पद्धतीच्या डिजिटल माध्यमाचा वापर, माहिती संकलित करून गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रथमच केला जात आहे. ज्याद्वारे ग्रामपंचायत स्तरावरून एकाच वेळी आराखडे प्राप्त होणार आहेत. या आराखड्याच्या पडताळणीनंतर आराखड्यांना १५ ऑगस्ट २९२१ च्या संभाव्य ग्रामसभेत किंवा ग्रामपंचायत सभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.

Web Title: Village Action Plan: Taluka level training started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.