ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात सराव प्रथम!
By admin | Published: April 7, 2017 01:30 AM2017-04-07T01:30:10+5:302017-04-07T01:30:10+5:30
अकोला : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यांतर्गत तपासणी समितीने जिह्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस गुरुवारी जाहीर करण्यात आले.
दुसरे पाराभवानी, तर तृतीय क्रमांकावर मांडोली
अकोला : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यांतर्गत तपासणी समितीने जिह्यातून प्रथम क्रमांक सराव, पाराभवानी द्वितीय, तर मांडोली ग्रामपंचायतला तृतीय क्रमांकाचे बक्षीस गुरुवारी जाहीर करण्यात आले. तपासणी समितीने १४ गावांची पाहणी केली होती.
यावेळी विशेष तीन पुरस्कारांसाठीही ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यामध्ये बाभूळगावला आबासाहेब खेडकर पुरस्कार, केळीवेळी ग्रामपंचायतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर वसंतराव नाईक पुरस्कार बेलुरा ग्रामपंचायतला देण्यात आला. निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांचा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, समर्थ शेवाळे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, कार्यक्रम व्यवस्थापक गजानन महल्ले, शाहू भगत्विकास अधिकारी जी.के. वेले, श्रीकांत फडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक समर्थ शेवाळे यांनी केले. सरावचे सरपंच वसंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.