ग्रामविकास अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:18 AM2017-07-30T02:18:36+5:302017-07-30T02:18:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पीक विम्यासंदर्भात गोंधळ झाल्याने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी तालुक्यातील उगवा येथे दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामविकास अधिकारी गणेश हिवरकार अनुपस्थित असताना ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे त्यांना निलंबित करण्याचे जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सांगितले. त्यानुसार शनिवारी हिवरकार यांच्यावर कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी उगवा येथील बँक अधिकारी पीक विम्याची रक्कम स्वीकारत नसल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडेय यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी उगवा गाठले. बँक व्यवस्थापकाशी चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यापुढे विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी हिवरकार गावात येत नसल्याने विविध कागदपत्रे मिळत नाहीत. परिणामी, चकरा माराव्या लागतात. गावात पाणी समस्या आहे, त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी संपर्क करीत हिवरकार यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शनिवारी सकाळीच निलंबनाचे आदेश दिले.