गावपातळीवरील पुढाऱ्यांची इस्री कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:56+5:302020-12-25T04:15:56+5:30
तेल्हारा : गावपातळीवरील मिनी मंंत्रालय असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक २०२० साठी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. गावातील ...
तेल्हारा : गावपातळीवरील मिनी मंंत्रालय असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक २०२० साठी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. गावातील गल्लीबोळातील गावपुढारी कडक इस्री मारून पॅनलकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
तेल्हारा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत सन २०२० च्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. गावोगावी आता उमेदवार अर्ज भरण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सध्या उमेदवार करत आहेत. तसेच आरक्षित जागांसाठी अर्ज भरण्यासाठी जात पडताळणी पावती व हमीपत्र सादर करावे लागणार आहे, ती तयारी सध्या सुरू आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज भरण्याची मुदत ही ३० डिसेंबरपर्यंत आहे, परंतु २५,२६,२७ तीन दिवस सुट्टी आल्याने गुरुवारी उमेदवारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी तहसील परिसरात गर्दी केली हाेती.
===================
निवडणूकीकरिता सरपंच पदाचे आरक्षण सुरूवातीला जाहीर केले. त्यानंतर शासनाने सरपंच आरक्षण निवडणूक झाल्यानंतर काढण्यात येणार असल्याचे आदेश काढल्याने गावा गावात सरपंच पदावर डोळा ठेवून पॅनल उभे करणारे पुढाऱ्यांनी हात आवरता घेतल्याचे दिसत आहे.
====================
तालुक्यातील हिवरखेड, कारला, सौंदाळा, गोर्धा, हिंगणी बुद्रुक ,दानापूर, खंडाळा, आडगाव बुद्रुक, शिवाजीनगर, शिरसोली, अटकळी, चांगलवाडी, रायखेड, बेलखेड, वरुड बुद्रुक, घोडेगाव, राणेगाव, जस्तगाव, भांबेरी, थार, तुदगाव, वाकोळी, इसापूर, वाडी आदमपूर, वडगाव रोठे, मनब्दा, खेल देशपांडे, वांगरगाव ,तळेगाव वडनेर, अडसूळ, खेल सटवाजी, नरसीपुर, नेर,पिंवदळ खुर्द या या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी कडाक्याच्या थंडीत वातावरण गरम दिसत आहे.