महिलांच्या हाती गावाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:09+5:302021-01-20T04:19:09+5:30
अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २ हजार ३९५ महिला उमेदवारांनी उडी घेतली हाेती. त्यापैकी महिलांना विजयश्री प्राप्त ...
अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २ हजार ३९५ महिला उमेदवारांनी उडी घेतली हाेती. त्यापैकी महिलांना विजयश्री प्राप्त झाली असून, गावगाड्याचा कारभार समर्थपणे हाताळण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या २ हजार ७० जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. तब्बल ४ हजार ४११ उमेदवार निवडणूक लढवली. त्यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये २ हजार ३९५ महिला उमेदवार असून, २ हजार १६ पुरुष उमेदवारांचा समावेश हाेता निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या पुरुष उमेदवारांच्या तुलनेत जास्त असल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये महिला सदस्यांची संख्यादेखील जास्त राहणार असल्याचे चित्र हाेते, ते काही अंशी खरे ठरले.
तालुकानिहाय महिला उमेदवारांची संख्या
तेल्हारा ......... ३१३
अकोट .......... ३६६
मूर्तिजापूर ...... २१२
अकोला ..........५०१
बाळापूर ........ ४०९
बार्शीटाकळी....२६५
पातूर ............. २४९
या आधी घरातील कुठल्याही व्यक्तीला राजकीय अनुभव किंवा वारसा नाही; मात्र गावाच्या विकासासाठी निवडणूक लढविली. आता गावातील गरजू विद्यार्थ्यांना वाचनालयाची व्यवस्था, पाणीटंचाईची समस्या, हगणदारीमुक्त गाव करणे या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यावर भर राहील.
अश्विनी गुलाबराव वरोकार ग्रा.पं. सदस्य -दाळंबी, ता. मूर्तिजापूर
तरुणांनी शहराची वाट न धरता गावातच राहावे. गावात ग्रामीण व्यवसायाला प्राधान्य देऊन बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व मेळावे घेऊन ग्रामीण भागातून शहरात जाणाऱ्यांना ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.
शुभांगी आनंद हातोले
ग्रा. पं. सदस्य, पारस
.0...................................................
इंधनाच्या दरवाढीचा फटका हा थेट सर्वच वस्तूंची महागाई वाढण्यावर हाेताे. आता प्रत्येकाच्या घरीच वाहने आहेत. त्यामुळे साहजिक महिन्याचे बजेट काेलमडते.
संगीता एन. भाकर
वकील
.0...................................................
दर महिन्याच्या ठरावीक उत्पन्नामध्ये सर्व गरजांची पूर्तता केली जाते; मात्र इंधनाची दरवाढ झाली. काही साहजिकच खर्चाचा ताळमेळ लागत नाही. महागाईमुळे चटके बसतातच.
अनिता अरविंद मुकवाने
शिक्षिका