गाव कारभाऱ्यांनी गावाचा विकास साधावा- देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:19+5:302021-02-24T04:20:19+5:30

पातूर : गाव कारभाऱ्यांनी गाव विकासाचा आराखडा तयार करून समन्वयातून गावाचा विकास साधावा, असे प्रतिपादन जि. प. सदस्य ...

Village stewards should develop the village- Deshmukh | गाव कारभाऱ्यांनी गावाचा विकास साधावा- देशमुख

गाव कारभाऱ्यांनी गावाचा विकास साधावा- देशमुख

Next

पातूर : गाव कारभाऱ्यांनी गाव विकासाचा आराखडा तयार करून समन्वयातून गावाचा विकास साधावा, असे प्रतिपादन जि. प. सदस्य विनोद देशमुख यांनी केले.

विवरा ग्रामपंचायतमध्ये आयोजित कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच अमर पजई हाेते. यावेळी पं. स. सदस्य रेखा इंगोले, चरणगावच्या सरपंच वर्षा इंगळे, आसोला ग्रा. पं. सरपंच रेखा कडू, प्रशिक्षक अंकुश ठाकरे यांची उपस्थिती हाेती. प्रास्ताविक ग्रामसेवक पी. पी. चव्हाण यांनी केले, ते म्हणाले की, अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पातुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनंत लव्हाळे यांच्या मार्गदर्शनात ‘आमचा गाव आमचा विकास’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सन २०२१ ते २२ आराखडा तयार करावयाचा आहे, त्या अनुषंगाने गावाच्या विकासाचं नियोजन करायचं आहे, असे ते म्हणाले.

पातुर तालुक्यातील १२ पंचायत समिती गणापैकी की ९ गणांमध्ये गणस्तरीय गाव विकासाचे नियोजन करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या.

कार्यशाळेला कृषि अधिकारी जे. एस. सोनोने, अंगणवाडी सेविका अंजली काळपांडे, श्रीनिवास चव्हाण, अंजली धनोकार, सहाय्यक प्रशासन अधिकारी उल्हास घुले, पद्मा दांदळे, एम. यु. सोळंके, कनिष्ठ प्रशासनाधिकारी, वंदना गजानन देशमुख, व्हि. जे. शिंदे, कनिष्ठ अभियंता, अलका शिरसाट, समाधान राठोड बाल प्रकल्प विकास अधिकारी, गीता ठाकरे, अंकुश ठाकरे विस्तार अधिकारी, संगीता वाडेकर, आर. एस. गवळी विस्तार अधिकारी, साधना धाडसे, यु. एम. मोकळकर विस्तार अधिकारी, मालती पारवे यांच्यासह ग्रा. पं. सरपंच, उपसरपंच, ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती हाेती. मसूर येथे विस्ताराधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे, अंगणवाडी सेविका विजयमाला सोनाजी देवकते, खानापूर शेख अब्दुल्ला शेख मजीद विस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका नंदाताई नाभरे, दिग्रस बुद्रुक यु. एम. शेगोकार, सहाय्यक पशुधन अधिकारी, अंगणवाडी सेविका सुमंत चिकटे यांच्या उपस्थितीत गणस्तरीय कार्यशाळांचे आयोजन केले आहे.

Web Title: Village stewards should develop the village- Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.