पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारीला होणार प्रसिद्ध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 02:37 PM2020-02-10T14:37:33+5:302020-02-10T14:37:38+5:30
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले.
अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे. शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रसिद्ध होणार असल्याने, कर्जमाफीस पात्र ठरलेल्या संबंधित शेतकºयांना यादीमधील नाव गावातच पाहता येणार आहे.
१ लाख ८ हजार शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर ‘अपलोड’!
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १३ हजार ८४९ थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. शनिवार, ८ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.