अंबोडा येथील ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:19 PM2020-02-04T12:19:49+5:302020-02-04T12:19:57+5:30
बुधवारी अकोट येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले.
अकोला : जुन्या रेकॉर्डनुसार व शासन निर्णयानुसार अतिक्रमित जागा नियमानुकूल करून, घरकुलांचा लाभ देण्याची मागणी करीत अकोट तालुक्यातील अंबोडा येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
अकोट तालुक्यातील अंबोडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या जागेवर राहणाºया नागरिकांकडे नमुना ८ अ नसल्याने घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे जुन्या ‘रेकॉर्ड’नुसार आणि शासनाच्या निर्णयानुसार अतिक्रमित जागा नियमानुकूल करून जागेचा मालकी हक्क नमुना ८ अ देण्यात यावा आणि त्या जागेवर घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी अंबोडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सादर करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित मुद्द्यावर बुधवारी अकोट येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्यासह बाळकृष्ण उईके, महेश कोमटी, ज्ञानेश्वर अंभोरे, अन्ना अंभोरे, बादल अंभोरे, महेश अंभोरे, मारोती शिवरकार, राहुल अंभोरे, जानराव कोमटी, रमेश कोमटी, अण्णा पचारी, गजानन अंभोरे, जगदीश शिवरकार, रमेश अंभोरे, गणेश शिवरकार व अंबोडा येथील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
... तर १ मेपासून बेमुदत उपोषण!
अतिक्रमित जागेचा मालकी हक्क नमुना ८ अ मिळाला नाही आणि घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही, तर १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही अंबोडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.