पाणी व चारा टंचाईने गावकरी हैरान

By admin | Published: May 23, 2014 05:41 PM2014-05-23T17:41:50+5:302014-05-24T21:13:05+5:30

मूर्तिजापूर : पाणी व चारा टंचाईने मूर्तिजापूर उपविभाग ढवळून निघाला आहे. अधिकार्‍यांचे नियोजन कमी पडत असून, दोन्ही समस्या शेतकर्‍यांना हैरान करीत आहेत. आजमितीस पूर्वीची गोठाण संकल्पनाही मोडकळीस आल्याचे चित्र सर्वदूर असून, आज खेड्यातही पाकीटचे दूध सर्वत्र सहज उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील अनेक गावातील गायरानावर गावकर्‍यांनी अतिक्रमण केल्याने गोठाण नाहिसे झाले आहेत. सिरसो, लाखपुरी, दहातोंडा, सांगवी, राजनापूर, माना, कुरू म, जामठी, अनभोरा, कोळंबी, मधापूरी येथील शेतकर्‍यांनी जनावरे बेभाव विक्रीला काढले आहेत. चारा व पाणी टंचाई यामागचे एकमेव कारण समोर आले आहे. अकोला तालुक्यातील सांगळूद, मूर्तिजापूर, अकोला, हातरू ण, चोहो˜ा बाजार या ठिकाणचे बैलबाजार प्रसिद्ध आहेत. बैलबाजारात जनावरे विक्रीसाठी येत आहेत.

The villagers are shocked by water and fodder scarcity | पाणी व चारा टंचाईने गावकरी हैरान

पाणी व चारा टंचाईने गावकरी हैरान

Next

मूर्तिजापूर : पाणी व चारा टंचाईने मूर्तिजापूर उपविभाग ढवळून निघाला आहे. अधिकार्‍यांचे नियोजन कमी पडत असून, दोन्ही समस्या शेतकर्‍यांना हैरान करीत आहेत. आजमितीस पूर्वीची गोठाण संकल्पनाही मोडकळीस आल्याचे चित्र सर्वदूर असून, आज खेड्यातही पाकीटचे दूध सर्वत्र सहज उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील अनेक गावातील गायरानावर गावकर्‍यांनी अतिक्रमण केल्याने गोठाण नाहिसे झाले आहेत. सिरसो, लाखपुरी, दहातोंडा, सांगवी, राजनापूर, माना, कुरू म, जामठी, अनभोरा, कोळंबी, मधापूरी येथील शेतकर्‍यांनी जनावरे बेभाव विक्रीला काढले आहेत. चारा व पाणी टंचाई यामागचे एकमेव कारण समोर आले आहे.  गोधनापासून मिळणार्‍या शेणखताला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरण्यात येत आहेत. यांत्रिक शेतीमुळे अनेक शेतकर्‍यांनी बैल जोपासणे बंद केल्याचे भीषण वास्तव समाजात दिसत आहे. ज्वारी व इतर चारा पिकांची पेरणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वैरण टंचाईचा सामना शेतकर्‍यांना यापुढेही करावा लागणार आहे. पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाय असायची; परंतु आता गाय दिसत नाही. 

Web Title: The villagers are shocked by water and fodder scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.