खिरपुरी येथे एक महिन्यापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:27+5:302021-05-05T04:31:27+5:30

२० लाखांच्या महाजल योजनेंतर्गत गेल्या वीस वर्षांत एक थेंब पाणीसुद्धा गावात आले नसून, पाणी योजना चालू होती. गेल्या चार ...

Villagers have been wandering for water at Khirpuri for a month now | खिरपुरी येथे एक महिन्यापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

खिरपुरी येथे एक महिन्यापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

Next

२० लाखांच्या महाजल योजनेंतर्गत गेल्या वीस वर्षांत एक थेंब पाणीसुद्धा गावात आले नसून, पाणी योजना चालू होती. गेल्या चार महिन्यांपासून ही योजनासुद्धा बंदच आहे. योजना कधी चालू होणार आणि ही योजना चालू करण्यासाठी कोणत्या प्रकारे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य प्रयत्न करताना दिसत नाहीत.

गरीब जनतेला भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, या कोरोना काळामध्ये लहान मुलांनासुद्धा पाणी भरण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे. विकासकामांच्या मुद्यांवर निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच गावाच्या विकासाबाबत उत्साही दिसत नाहीत. पाणीपट्टी भरणारे व न भरणारे सर्व एका दावणीला बांधलेले आहेत. गावातील मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. गावातील अतिक्रमणांकडे कोणाचेच लक्ष नाही. भर उन्हाळ्यात पाण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. दलित वस्ती रोडमध्ये बांधण्यात आलेल्या ५८ लाखांचा रस्ता दिसत नाही. रोडच्या दोन्ही साइडला नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. तरी बिल काढण्यात आले.

Web Title: Villagers have been wandering for water at Khirpuri for a month now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.