सोनुना गावचे पोलीसपाटील यांच्याविरुद्ध ग्रामस्थांची पोलिसांत तक्रार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:53+5:302021-06-03T04:14:53+5:30

ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, पोलीसपाटील रमेश नारायण कदम हे गावकऱ्यांवर अन्याय करून पदाचा गैरवापर करीत आहेत. गावकऱ्यांच्या खोट्या तक्रारी ...

Villagers lodge complaint against Sonuna village police! | सोनुना गावचे पोलीसपाटील यांच्याविरुद्ध ग्रामस्थांची पोलिसांत तक्रार !

सोनुना गावचे पोलीसपाटील यांच्याविरुद्ध ग्रामस्थांची पोलिसांत तक्रार !

Next

ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, पोलीसपाटील रमेश नारायण कदम हे गावकऱ्यांवर अन्याय करून पदाचा गैरवापर करीत आहेत. गावकऱ्यांच्या खोट्या तक्रारी करून प्रशासनाची दिशाभूल करीत आहेत. पोलीसपाटील कदम हे मजुरांना शेतात बोलावतात. परंतु त्यांना मजुरीचे पैसे देत नाहीत. पैसे मागितले तर, मजुरांना धमकी देतात. रहिवासी दाखला देण्यासाठी ग्रामस्थांना पैसे मागतात. गाव विकासात अडथळे आणतात. तसेच ग्रामस्थांना खोट्या तक्रारींमध्ये अडकविण्याची धमकी देतात. अशी तक्रार दत्ता सीताराम गिऱ्हे यांच्यासह गावातील भागवत शिंदे, गणेश हांडे, विलास चोंडकर, सुनील चोंडकर, सतीश गिऱ्हे, विष्णू गिऱ्हे, महादेव चोंडकर, सीताराम करवते, किसन डाखोरे, सुभाष लठाड, गुलाब शिंदे, गजानन शिंदे, दिनकर कदम, गजानन खुळे, बबन चोंडकर, रामेश्वर गिऱ्हे, बबन चोंडकर, सदानंद चाेंडकर, रामा अंभोरे, दीपाली गाढवे, रंजना हांडे, सखू चोंडकर, सूर्यकला हांडे, सीता हांडे, पंचफुला चोंडकर, कमला लठाड, तारा हांडे, लक्ष्मी चोंडकर, मथुरा हांडे, अनिता अंभोरे, मंगला गिऱ्हे, लीलाबाई शिंदे, अन्नपूर्ण करवते, वच्छला चोंडकर, अर्चना गिऱ्हे, कमला लठाड, प्रमिला गिऱ्हे यांच्या गावातील शेकडो पुरुष, महिलांनी केली आहे.

मी ३५ वर्षांपासून पोलीसपाटील पदावर कार्यरत आहे. आतापर्यंत कुणीही तक्रार केली नाही. माझ्या शेतातील जागेत मंदिर बांधण्यास विरोध केल्यामुळे काहींच्या भुलथापांना बळी पडून ग्रामस्थांनी माझ्या कुटुंबावर बहिष्कार घातला. १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे आता माझ्याविरुद्ध कटकारस्थान करून पोलिसांत तक्रार देत आहेत.

मी पदाचा गैरवापर केला नाही. केलेले आरोप सर्व खोटे आहेत.

-रमेश नारायण कदम, पोलीसपाटील, सोनुना

Web Title: Villagers lodge complaint against Sonuna village police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.