पुनर्वसित गावातील ग्रामस्थ मेळघाटकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 03:50 PM2017-09-09T15:50:13+5:302017-09-09T16:02:09+5:30
आकोट (जि. अकोला): शासनाकडून पुनर्वसित गावांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप करीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून आकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुळ गावांकडे परत जाण्यास शनिवारी सुरुवात केली.
आकोट (जि. अकोला): शासनाकडून पुनर्वसित गावांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप करीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून आकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुळ गावांकडे परत जाण्यास शनिवारी सुरुवात केली. शासनानं पुर्नवसित गावांमध्ये शासकीय सुविधा न पुरविल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मेळघाटातून अकोटमध्ये पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांचा एल्गार, प्रशासनाला झुगारून ग्रामस्थ आपापल्या मुळ गावाच्या दिशेने रवाना, सुमारे १५ हजार ग्रामस्थ असल्याची माहिती, तणावाची परिस्थिती असून अकोट ग्रामीण पोलीस, एसआरपीएफचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अकोट वन्य जीव विभागाने त्यांना असे न करण्याविषयी जाहीर आवाहन केले होते. मात्र, प्रशासनाचा विरोध झुगारून मेळघाट मधून अकोला जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आलेल्या नागरतास,अमोना,बारखेडा,धारगड,,गुल्लरघाट, सोमठाणा बु. सोमठाणा खु. व केलपाणी या गावातील सुमारे पंधरा हजार लोकांनी आपापल्या गावाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून अकोट ग्रामीण पोलीस, सीआरपीएफ चा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत