विदर्भातून दहा तालुक्यांतील ग्रामस्थ होणार सहभागी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:39 AM2017-08-05T01:39:24+5:302017-08-05T01:41:12+5:30

अकोट : जलसंवर्धन व जलसंधारणाकरिता राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता विदर्भातील १0 तालुक्यांमधून प्रतितालुका तीन एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसकरिता येणारा खर्च हा जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या बसची व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शासनाने १ ऑगस्ट रोजी आदेश दिले आहेत. 

Villagers from ten talukas will be participating from Vidarbha! | विदर्भातून दहा तालुक्यांतील ग्रामस्थ होणार सहभागी!

विदर्भातून दहा तालुक्यांतील ग्रामस्थ होणार सहभागी!

googlenewsNext
ठळक मुद्देवॉटर कप बक्षीस समारंभ जलयुक्तच्या निधीमधून प्रवासाची तरतूदवॉटर कप स्पर्धेत जितापूरने बाजी मारली 

अकोट : जलसंवर्धन व जलसंधारणाकरिता राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता विदर्भातील १0 तालुक्यांमधून प्रतितालुका तीन एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसकरिता येणारा खर्च हा जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीमधून करण्यात येणार आहे. या बसची व्यवस्था करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना शासनाने १ ऑगस्ट रोजी आदेश दिले आहेत. 
राज्यात जलक्रांती घडविण्याकरिता शासनाच्या योजनेसोबतच अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशननेसुद्धा वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. या वॉटर कपच्या माध्यमातून गावात लोकसहभाग व श्रमातून जलसंधारणाची कामे झाली. या कामांचे मूल्यमापन केल्यानंतर राज्यातील १२ गावांची निवड करण्यात आली आहे. या १२ पैकी प्रथम, द्वितीय व तृतीय या गावांची निवड करण्यात येणार आहे. या सर्व गावांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने ६ ऑगस्ट रोजी बालेवाडी पुणे येथे बक्षीस समारंभ ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरिता विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट, पातूर, बाश्रीटाकळी, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, राळेगाव, कळंब, अमरावती जिल्ह्यातील वरुड, धारणी, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वर्धा जिल्ह्यातील आर्णी अशा १0 तालुक्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या १0 तालुक्यांतून बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला १५00 गावकरी येण्याचे अपेक्षित आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या गावांमधील नियोजनाबाबत माहिती देण्याकरिता व पाणी फाउंडेशनच्या बक्षीस समारंभाला उपस्थित राहण्याकरिता पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला गावकर्‍यांच्या येण्या-जाण्याकरिता प्रतितालुका राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसची व्यवस्था करावी, बसच्या प्रवासाकरिता येणारा खर्च जलयुक्त शिवारच्या आकस्मिक खर्चासाठी असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा, असे आदेश ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी पाच जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला विदर्भातील गावकर्‍यांच्या ३0 बस भरून जाणार आहेत. 
-

Web Title: Villagers from ten talukas will be participating from Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.