अखिल भारतीय मराठा महासंघ उपाध्यक्षपदी विनायकराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:17 IST2019-11-17T18:16:56+5:302019-11-17T18:17:05+5:30
सभेत विनायकराव पवार यांची मध्यवर्ती कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अविरोध फेरनिवड करण्यात आली.

अखिल भारतीय मराठा महासंघ उपाध्यक्षपदी विनायकराव पवार
अकोला : अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे संपन्न झाली. या सभेत विनायकराव पवार यांची मध्यवर्ती कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अविरोध फेरनिवड करण्यात आली. सभासद व पदाधिकाऱ्यांच्या भरगच्च सभेत अॅड. शशिकांत पवार यांची अध्यक्षपदी, राजेंद्र कोंढरे सरचिटणीसपदी तर विनायकराव पवार, तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष मा. आ.नरेंद्र पाटील, वसंतराव मुळीक, संतोष नानोटे यांची उपाध्यक्षपदी, प्रकाश देशमुख कोषाध्यक्षपदी, दिलीपदादा जगताप संयुक्त सरचिटणीस पदी, प्रमोद जाधव विभागीय चिटणीसपदी अविरोध निवड करण्यात आली. यावेळी राज्यातील बहुसंख्य पदाधिकारीसह अकोल्यातील जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, सरचिटणीस अविनाश नाकट, उपाध्यक्ष सचिन शिंदे, महानगर अध्यक्ष संजय सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्रीकांत सरोदे, वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष नितीन वाणी उपस्थित होते.