सर्वोपचार रुग्णालयात आचारसंहितेचे उल्लंघन
By Admin | Published: September 22, 2014 01:22 AM2014-09-22T01:22:44+5:302014-09-22T01:22:44+5:30
अकोला येथीन सर्वाेपचार रुग्णालयातील कोनशिला झाकल्याच नाहीत.
अकोला : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील इमारतींवर असलेल्या कोनशिला झाकल्या नसल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. या कोनशिलांवर राजकीय पक्ष व नेत्यांची नावे आहेत.
राज्यात १९ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आचारसंहिता जाहीर झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, नेत्यांची सरकारी वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रशासन नेत्यांच्या चमकोगिरीला लगाम लागला. शहरातील राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींचा प्रचार करणारे अनधिकृत फ्लेक्स, लोखंडी बोर्ड काढण्यात आले. काही इमारतींवरील मजकूर झाकला गेला.
दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयातील इमारतींवरील कोनशिला झाकण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. रुग्णालय परिसरातील इमारतींवर जवळपास १0 कोनशिला आहेत. यावर राजकीय पक्ष, नेते, उद्घाटनाची दिनांक आदींचा उल्लेख आहे.