लग्नसोहळ्यात नियमांचे उल्लंघन; १५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:32+5:302021-05-23T04:17:32+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लग्नसोहळ्याची नियमावली जारी केली आहे. तालुक्यातील रुईखेड येथे शनिवार, दि. २२ मे रोजी विनापरवाना, ...

Violation of rules at weddings; 15 thousand fine recovered | लग्नसोहळ्यात नियमांचे उल्लंघन; १५ हजारांचा दंड वसूल

लग्नसोहळ्यात नियमांचे उल्लंघन; १५ हजारांचा दंड वसूल

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लग्नसोहळ्याची नियमावली जारी केली आहे. तालुक्यातील रुईखेड येथे शनिवार, दि. २२ मे रोजी विनापरवाना, नियमांचे उल्लंघन केलेल्या लग्नसोहळ्याला पाच हजार दंड ठोकण्यात आला, तर अकोट शहरात नवदुर्गा नगर येथील विनापरवानगी लग्न स्वागत समारंभात गर्दी झाल्यामुळे दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार हरीश गुरव, ग्रामीणचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे, शहरचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे, तलाठी गोपाल वानरे, नगर परिषदचे ईश्वरदास पवार, सुनील नाथे, संजय बेलूरकर, सिद्धांत वानखडे यांनी संयुक्तपणे केली. दरम्यान, २० मे रोजी सावरा व अडगाव खुर्द येथे लग्नसोहळ्यात दंडात्मक कारवाई केली होती. ही कारवाई कर्जबाजारी असलेल्या शेतकरी, शेतमजूर यांच्या घरी करण्यात आली, तर दुसरीकडे सर्रासपणे गर्दी करून नियमांचे उल्लंघन होत असताना कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाई करताना भेदभाव करण्यात येऊ नये, तसेच लग्नसोहळ्यात वसूल केलेल्या दंडाची रक्कम परत करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशा स्वरूपाची तक्रार जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकोट यांना शेतकऱ्यांनी दिली आहे.

Web Title: Violation of rules at weddings; 15 thousand fine recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.