नियमांचे उल्लंघन दंड ठाेठावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:16 AM2021-04-19T04:16:29+5:302021-04-19T04:16:29+5:30
उत्पादनासाठी माती परीक्षण करा अकोला : उत्पादन वाढवायचे असेल तर माती परीक्षण करणे गरजेचं आहे, अशी माहिती वैभव शेटे ...
उत्पादनासाठी माती परीक्षण करा
अकोला : उत्पादन वाढवायचे असेल तर माती परीक्षण करणे गरजेचं आहे, अशी माहिती वैभव शेटे यांनी लोणाग्रा येथील शेतकऱ्यांना दिली आहे. यावेळी प्राचार्य डॉ. राम खर्डे, विषय तज्ज्ञ गोपाल बेद्रे आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.
नेमून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करा
अकोला : नेमून दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कोराना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे गृहित धरून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
आज ऑनलाइन रोजगार मेळावा
अकोला : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला. या कार्यालयामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवार १९ ते शुक्रवार दि. २३ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली यो. बारस्कर यांनी दिली आहे.
आरटीओ कार्यालयात प्रलंबित कामकाज
अकोला : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चैन अंतर्गत सूचना आणि निर्देश जारी केले आहे. त्याच आनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथील कार्यालयामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ठराविकच काम हाेणार असून, प्रलंबित कामे पूर्ण केली जाणार आहेत.