‘व्हायरल’चा विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 07:46 PM2017-09-07T19:46:29+5:302017-09-07T19:48:49+5:30
वातावरणात झपाट्याने होणारे बदल, दिवसा कडक ऊन व रात्रीचा गारवा, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव व दूषित पाणी या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्हय़ाला ‘व्हायरल फिव्हर’चा विळखा पडला आहे. तीव्र ताप, सर्दी- खोकला या विषाणूजन्य आजारासह, दूषित पाण्या पासून होणार्या आजारांचे रुग्ण घराघरांमध्ये दिसत आहेत. अशातच डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या आजाराचे रुग्ण वाढल्याने संपूर्ण जिल्हाच तापाने फणफणल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वातावरणात झपाट्याने होणारे बदल, दिवसा कडक ऊन व रात्रीचा गारवा, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव व दूषित पाणी या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्हय़ाला ‘व्हायरल फिव्हर’चा विळखा पडला आहे. तीव्र ताप, सर्दी- खोकला या विषाणूजन्य आजारासह, दूषित पाण्या पासून होणार्या आजारांचे रुग्ण घराघरांमध्ये दिसत आहेत. अशातच डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या आजाराचे रुग्ण वाढल्याने संपूर्ण जिल्हाच तापाने फणफणल्याचे चित्र आहे.
पावसाळय़ाचे दिवस असतानाही दुपारी तापणारे ऊन आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा, अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सवरे पचार रुग्णालयासह लहान-मोठय़ा दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. पावसामुळे शहरातील बहुतांश भागात डबके साचले आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट जाणवू लागला आहे. हात-पाय दुखणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. सर्वाेपचार रुग्णालयासह शहरा तील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी डेंग्यू, डायरियासह स्वाइन फ्लूचीदेखील प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे कुठल्याही दुखण्याला साधारण समजून न टाळता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
‘प्लेटलेट’ कमी होण्यार्या रुग्णांची संख्या मोठी
पावसाळय़ात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढीस लागले आहे. डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आजारी पडलेल्या रुग्णांच्या रक्त नमुन्यांची त पासणी केली असता, प्लेटलेट कमी झाल्याचे आढळून येतात; मात्र डेंग्यूचा अहवाल ‘निगेटिव्ह’ येत असल्याने डॉक्टरही संभ्रमात पडले आहेत.
‘स्वाइन फ्लू’ची धास्ती कायम
डेंग्यू, हिवताप यासारख्या आजारांचे रुग्ण वाढत असतानाच शहरासह संपूर्ण जिल्हय़ात स्वाइन फ्लू या घातक आजाराची धास्ती कायम आहे. या संसर्गजन्य आजारामुळे ग्रस्त असलेल्या नऊ पॉझिटिव्ह रुग्णांवर शहरातील मल्टिस्पेशालिटी इस्पितळ व सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात आता पर्यंत स्वाइन फ्लूने २0 जणांचा बळी घेतला आहे.
सध्या वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत, तसेच डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे ‘व्हायरल फिव्हर’चे रुग्ण वाढले आहेत. ताप, सर्दी-खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.