कृषी महाविद्यालयात आभासी पद्धतीने वार्षिक स्नेहसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:35+5:302021-06-26T04:14:35+5:30
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे व सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस एस. माने हे होते. याप्रसंगी कुलगुरू ...
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे व सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस एस. माने हे होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. भाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण शाखा प्रमुख डॉ. एस. पी.लांबे यांनी केले. सूत्रसंचालन अंतिम वर्षाचे विद्यार्थी अभिषेक पाटील व शीतल इंगळे यांनी तर स्वागत गीत तृतीय वर्षाची विद्यार्थिनी वैशाली शेळके हिने सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच गौरी पिंजरकर हिने सुंदर असे नृत्य सादर केले. आभार प्रदर्शन शलाका महल्ले हिने केले. या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, उत्स्फूर्त भाषण, निबंध स्पर्धा, फोटोग्राफी, बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कुणाल अपार, भूषण खवले, वेदांग देशपांडे, ऋतुजा जुमनाके, तुषार खांडेकर, आदित्य कानडे यांनी परिश्रम घेतले.