निहिदा येथे कृषी अधिकाऱ्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:35 AM2020-12-15T04:35:03+5:302020-12-15T04:35:03+5:30
तलाठी गैरहजर; कामे खोळंबली! निहिदा : येथील तलाठी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. तलाठ्यास मुख्यालयी राहण्याची ...
तलाठी गैरहजर; कामे खोळंबली!
निहिदा : येथील तलाठी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. तलाठ्यास मुख्यालयी राहण्याची ॲलर्जी असल्याने तलाठी बाहेरगावाहून ये-जा करतात. निहिदा येथे तलाठी सतत गैरहजर असल्याने नागरिकांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी नाहक त्रास होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी होत आहे..
-----------------------
कापूस वेचणीची लगबग
बोरगावमंजू : परिसरात गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी धास्तावला आहे. परिसरातील सांगळूद, सिसा मासा, खरप बु., घुसर या भागात कपाशी वेचणीची कामे सुरू आहेत. पावसामुळे कपाशीचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी जादा मजुरी देऊन कापूस वेचणी करीत आहेत.
------------------------
बार्शीटाकळी तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था
बार्शीटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. खड्ड्यात वाहने चालविण्यामुळे वाहनांची अवस्था बिकट होत असल्याने वाहनचालकास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
----------------
बोरगाव मंजू बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य
बोरगाव मंजू : येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहक-चालकांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अकोला-मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोरगाव मंजू येथे परिसरातील खेड्यापाड्यांच्या नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे येथील बसस्थानकात नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
-----------------